another15peopleingodavalireportedpositive;sealtheaffectedpremisesfromtheadministration

esahas.com

गोडवलीत आणखी 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; प्रशासनाकडून बाधित परिसर सील

महाबळेश्‍वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.  पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 494 झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.