महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील शेतकरी पॉवर टिलरमध्ये अडकून जागीच ठार झाला. शंकर शेलार असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील शेतकरी पॉवर टिलरमध्ये अडकून जागीच ठार झाला. शंकर शेलार असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी (कोट्रोशी) येथील शेतकरी शंकर रामजी शेलार (वय ४५) हे रविवार, दि. १७ रोजी त्यांच्या शेतामध्ये पॉवर टिलरने काम करत होते. यावेळी त्यांचा हात आणि तोंड रोटरमध्ये गेल्याने चेंदामेंदा झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची खबर अक्षय संपत शेलार (वय २४, रा. बुरडाणी, कोट्रोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आय. एम. मुलाणी करत आहेत.