मोटारसायकल चोरी करणार्या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली आहे. अमर चंद्रकांत गवळी (वय 30, रा. जुना पॉवर हाऊस, ता. महाबळेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पाचगणी : मोटारसायकल चोरी करणार्या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली आहे. अमर चंद्रकांत गवळी (वय 30, रा. जुना पॉवर हाऊस, ता. महाबळेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पाचगणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पाचगणीच्या जुना पॉवर हाऊस येथील सार्वजनिक पार्किंगमधून मोटारसायकल फॅशन प्रो क्र. (एमएच 11 बीजे 7399) ही 11 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 ते 12 फेब्रुवारी सकाळी 8.30च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणून 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.27 वाजता महेश गणपत शेडगे (वय 34) यांनी यांनी फिर्याद दिली होती.
त्यानुसार पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपी अमर चंद्रकांत गवळी हा निष्पन्न झाला. पाचगणी पोलीस त्याचा शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी हा चोरीस गेलेल्या मोटारसायकल सोबत पाचगणीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर मोटारसायकल चोरास वाईकडे जात असताना 21 फेब्रुवारी रोजी पहाटे पसरणी घाटात पाचगणी पोलिसांनी शिताफीने पकडले. त्याच्याकडील 30 हजार किमतीची मोटारसायकल जप्त करून आरोपीस अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर यांच्यासमोर हजर करून त्याची पोलीस कस्टडी व रिमांड घेण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर, पो. ना. नीलेश माने, जितेंद्र कांबळे, पो. कॉ. सागर नेवसे यांनी केली.