sports

सुदृढ, सक्षम व सुशिक्षित पिढी घडवणे काळाची गरज

सुरेश मालुसरे यांचे प्रतिपादन : गोडवली येथे व्यायाम शाळेला साहित्य व विद्यार्थ्यांना वह्या वाटप

‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्‍वटेक अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले.

पाचगणी : ‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्‍वटेक अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले.  

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी गोडवली गावच्या व्यायाम शाळेस व्यायामाचे साहित्य व शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी गोडवलीचे सरपंच मंगेश पवार, संदीप मालुसरे, आर. डी. मालुसरे, माजी सरपंच सुरेश मालुसरे, हणमंत मालुसरे, संतोष मालुसरे, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष नितीन मालुसरे, युवक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आर. डी. मालुसरे म्हणाले, ‘सुरेश मालुसरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून एक वेगळा पायंडा पाडला आहे. या दातृत्वाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. या मिळालेल्या मदतीचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन गुणवत्ता वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.’ 

संदीप मालुसरे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष मालुसरे यांनी आभार मानले.