महाबळेश्वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्वर तालुक्यात आजअखेर 375 कोरोनाबाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्वर तालुक्यात आजअखेर 375 कोरोनाबाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
शहराच्या प्रतिबंधित क्षेत्रांत सतत वाढ होत असल्याने अनेक रस्ते रहदारीसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आजपर्यंत शहरातील 15 भाग पालिकेच्यावतीने बंद करण्यात आले असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाबळेश्वर पालिका कर्मचार्यांचे कोरोना तपासणी अहवाल टप्प्याटप्य्याने प्राप्त होत असून, पालिकेतील 49 कर्मचार्यांचे स्वॅब घेण्यात आले होते.
आज आलेल्या अहवालात यापैकी 13 कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने निष्पन्न झाले असून, हे कर्मचारी स्वच्छता विभाग व पालिका नाक्यांवरील आहेत.पालिकेच्या आजअखेर 47 कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली असून, या कर्मचार्यांची पालिकेच्यावतीने स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा व पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली.