mahabaleshwarpositive

esahas.com

महाबळेश्‍वरमध्ये आणखी 13 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाबळेश्‍वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्‍वर तालुक्यात आजअखेर 375 कोरोनाबाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.