टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेत 27 जुलौपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया लवकरच श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची हत्या झाली आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर धम्मिका निरोशन (Dhammika Niroshan) याची हत्या ...
पुणे, दि. 3 फेब्रुवारी 24 पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या दक्षिण कमांडच्या सहकार्याने पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिटयूट येथे “कलम आणि कवच” या संरक्षणविषयक साहित्य महोत्सवाचे दि. 3 फेब्रुवारी 24 रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घ...
पुणे, दि.1 फेब्रुवारी 24सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय चार वर्षांत एकदा होणाऱ्या या कार्यक्रमासाठी एकत्र येत असल्यामुळे, या शानदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे दिसून येत होते. या सोहळ्यासाठी उपस्थित नामवंत पाहुण्यांमध्ये अनेक सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह, परमवीर चक्रान...
World Athletics Championship 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू अर्थातच भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे.
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि पै फ्रेंडस लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख पुस्तकाचे मोफत वाटप.
अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमारे 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
बोरगाव पोलिसांनी नागठाणे गावामध्ये पेट्रोलिंग च्या दरम्यान शनिवारी पहाटे पाच वाजता वेळापुरे दुकानासमोर एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर पद्धतीने आणण्यात आलेला गुटखा व मारुती कंपनीचे चार चाकी वाहन असे एक लाख 63 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत सुमारे 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्यामध्ये एकूण 17 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये जेसीबी डंपर व वाळू याचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे.
इंदोली येथे मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये नवा कोरा ट्रॅक्टर जळून खाक झालाय. दरम्यान ही आग कोणी लावली याबाबत उलटसुलट चर्चा सुरुवात झालीय. ऊस दर प्रश्नांवर शेतकरी संघटनांनी गनिमी कावा सुरू केल्याच शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे.
अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ऊस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
शिरवळ परिसरात सातारा उप-प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना गाडी आडवी मारुन व जोरदार धडक देवून त्यांचा ‘गेम’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऍलर्ट असलेल्या त्यांच्या वाहन चालकाने हा प्रयत्न हाणून पाडला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून संबंधिताने केलेल्या भानगडी जिरवण्यासाठी त्याने आपल्या वरिष्ठ अधिकार्याचाच गेम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केलेली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यार दुचाकीवरुन चोरुन हजारो रुपये किंमतीच्या 221 विदेशी दारुच्या बाटल्या घेवून जाणार्याला पोलिसांनी पकडले. विनोद विश्वास जाधव (वय 42, रा.वाघेश्वर ता.जावली) असे संशयिताचे नाव आहे.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ किलोमीटर व पाच किलोमीटर या दोन गटात सकाळी सहा वाजता सुरु होणार असून, स्पर्धेचे आयोजन औद्योगिक परिसरात करण्यात आल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा येथील सनराईज स्पोर्ट क्लब आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ रोजी दुपारी ४ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल उपस्थित राहणार आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष सन 2022-23 नुकतेच सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांचेमार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
कोरेगाव डीवायएसपी व पुसेगाव पोलिसांच्या सहकार्याने शासकीय मातीची चोरी करणारी टोळी ताब्यात घेत गाळमातीने भरलेली वाहने व मोकळी वाहने असा एकूण 1,00,10000 रक्कमेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुसेगाव चे सहायक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांनी दिली.
पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात सैनिक स्कूल मैदान क्रीडा स्पर्धा अन रक्तदान शिबिर यांचं आयोजन 13 जून रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते व क्रीडा संघटक सादिक बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फलटण, ता. फलटण येथील बारामती पुलानजीक भेसळयुक्त डांबर व ऑईलची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यातील पथकाने धडक कारवाई करून ३४ बॅरलसह ३५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ॲक्सेल तुटल्याने मंगळवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सातारा नजीक असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलावर वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच वाहतूक पूर्ववत केली.
अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव बलभीम जगताप असे त्या इसमाचे नाव असून त्याच्याकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दणकेबाज महसूल जमा करीत शासनाच्या तिजोरीत 123.23 कोटी रुपयांची भर टाकली आहे.
दि. 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत सातारा शहरातील शाहू स्टेडीयम येथे महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा सन- 2021-2022 होणार असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धक व स्पर्धा पाहण्यासाठी येणारे नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जुना आर.टी.ओ. ऑफिस चौक ते भु-विकास बँक चौक व एस.टी.स्टँड इन गेट ते भु-विकास बँक चौक या मार्गावरील वाहतूकीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत आगामी काळामध्ये फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली.
फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आपल्या फिरकीच्या तालावर दिग्गज फलंदाजांना नाचवणाऱ्या शेन वॉर्नने अखेर या जगाचा ५२व्या वर्षी निरोप घेतला.
साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले (पवार) सध्या सातारा शहर व जिल्ह्याच्या समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. श्री.छ. शाहू क्रीडा संकुलातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देत याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही दिली.
राज्य शासनाकडून जिल्हा व तालुकास्तरावरील क्रीडा संकुलांना निधी मिळाला आहे. तो वेळेत खर्च करावा. मैदान नसणार्या तालुक्यांनी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना सहकारमंत्री व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या. दरम्यान, श्री. सौ. वृषालीराजे भोसले यांनी फुटबॉल मैदानासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली.
घेतला कामकाजाचा आढावा; केले अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन
वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि क्रेनवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने अचानक पेट घेतला. शनिवारी 15 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली.
पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा दि. 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत संपन्न होणार असून कोरोना आणि ओमायक्रान च्या अनुषंगाने ही यात्रा प्रशासनाच्या नियमावलीनुसार साजरी करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त पोलीस अधिक्षक अजय बंसल यांच्या सूचनेवरून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
जनावरांची बेकायदा वाहतूक करणारे दोन टेम्पो अडवून पोलिसांनी चाळीस म्हैशी व अकरा रेडकांची सुटका केली. तसेच टेम्पोच्या दोन चालकांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मलकापूर, ता. लारद येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सागर हॉटेल समोर शेळ्या-मेंढ्यांची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी कराड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. गुरुवारी ३० रोजी ही कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेऊन याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ विदेशात सहभागी झाला होता. त्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी राहिलेल्या कॅनडाला उपांत्य फेरीत धूळ चारत भारतीय व्हॉलीबॉल संघाने अंतिम टांझानिया संघासोबत झालेल्या लढतीत दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कराड येथील विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याने चालक, वाहक नसलेल्या एस.टी. बस मधुन प्रवाशांची अनधिकृतपणे वाहतुक केल्याचा प्रताप आज सकाळी सातारा येथील पोवई नाक्यावर उघडकीस आला. विसावा नाका येथुन काही युवकांनी या एस.टी.चा पाठलाग करून संबंधित कर्मचाऱ्यांचे पितळ उघड पाडल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने माफीनामा दिला.
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना म्हटले की, दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन निश्चित असते. मग त्यांचा सामना क्रिकेटच्या मैदानावर रंगो अथवा हॉकीच्या. शुक्रवारी (१७ डिसेंबर) हॉकीच्या आशियाई चँपियन्स ट्रॉफीमध्ये हे कट्टर प्रतिद्वंद्वी संघ आमने सामने आले होते. उभय संघांमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३-१ ने थरारक विजय मिळवला.
रस्त्याचे काम चालू असल्यामुळे कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे. त्यातच सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे ऊस वाहतूकसुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या ऊसाची वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रॉलींच्या पाठीमागे लाईट, रिफलेक्टर नसल्याने मोठे अपघात होत आहेत.
पासपोर्ट काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याला हेलपाटे मारण्याची सुरु असलेली पध्दत साताऱ्यातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील सर्वांना साताऱ्यात पासपोर्ट उपलब्ध होवू लागले. मात्र, इतर तालुक्यातून सातारला येणे देखील अनेकवेळा गैरसोयीचे ठरत असते.
सातारा-लातूर महामार्ग असल्याने या मार्गावर अगोदरच मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. त्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्या पासून या मार्गावर ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. सकाळ व सायंकाळी या रस्त्याने सर्व शासकीय, खासगी व बँक आदी कार्यालयाचे अधिकारी वर्ग, शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॅालीत क्षमतेपेक्षा किती तरी पटीने जास्त ऊस भरलेला असतो.
महाराष्ट्र राज्य गृहविभागाने वाहतुकीसंबंधी आकारण्यात येणार्या दंडामध्ये वाढ केली असून सर्वच दंडाची रक्कम दुप्पटीहून अधिक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही हा नियम लागू झाला असून शहरवासीयांनी वाहतुकीबाबत नियमांचे पालन करुन सहकार्य करावे. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सपोनि विठ्ठल शेलार यांनी दिला आहे.
गेल्या 48 तासांत भारतीय टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये जसे नाट्य रंगते, तसेच नाट्य भारतीय क्रिकेटमध्येही कर्णधारपदावरून रंगले. बीसीसीआयचे उच्च पदस्थ पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले. मात्र, कोहलीने त्याबाबत कोणतेही प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली, अशी चर्चा आहे.
सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून नवा इतिहास नोंदविला होता. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याने हॉकी इंडियाने मनप्रीत सिंगकडे नेतृत्व सोपविले आहे.
महाड, रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर मुले व मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा संघाचे प्रतिनिधित्व करताना सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदक, १ रौप्यपदक आणि १ कांस्य पदक अशा एकूण ६ पदकांची कमाई केली.
20 वर्ल्ड कप संपताच आता पुढील क्रिकेट सीरिजचे वेध लागले आहेत. राहुल द्रविड टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यापासून ही भारतीय क्रिकेट टीमची पहिली सीरिज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रच्या शिवराज राक्षेने उत्तर भारतीय मल्लांचे तगडे आव्हान मोडून काढीत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. फ्रीस्टाईल प्रकारात पुरुष व महिला मल्लानी दोन रौप्य आणि सात कास्य ग्रीकोरोमनमध्ये देखील तीन कास्यपदकासह महाराष्ट्राच्या संघाने दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश प्राप्त केले.
नीरजला नुकताच देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जात आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचे खूप कौतुक झाले आहे.
विश्वचषकानंतर विराट कोहलीने आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आला आहे. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोरोना महासाथीचे संकट अजून पूर्णत: टळले नाही आणि याच कारणामुळे कित्येक क्रीड संस्था या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय खबरदारी बाळगत आहेत. याच पार्श्वभूमीवर इस्तंबूलमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला मार्च २०२२ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
चारचाकी वाहनातून स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा अँटी टेररिस्ट सेलच्या (एटीसी) पथकाला मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणे येथे एक सुमो संशयास्पदरीत्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थांबवली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्यांचा साठा होता.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी सातारा आगारात कर्मचार्यांनी बंद पाळला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या या पाठिंब्याने आंदोलकांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.
कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील आव्हान संपुष्टात आले. आता भारताची नामिबियाविरुद्धची लढत फक्त औपचारिकता असेल.
युवराज सिंग संघात डाव्या हाताचा फलंदाज होता. ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता,
एएफसी 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने दुसरे स्थान पटकाविले. ई गटातील शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने शूटआऊटमध्ये किर्गी प्रजासत्ताकचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत गोलफलक कोरा राहिल्याने शेवटी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.
बुधवारपासून सुरू झालेल्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मात्र सायना नेहवालला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून निवृत्त व्हावे लागले. के. श्रीकांतचे आव्हान पहिल्या फेरीतच समाप्त झाले.
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे मी नाही... मी नाही... करणाऱ्यांनी अतोनात नुकसान केले. शून्य आकारात स्टेडियम बांधले की व्यापारी संकुल, ज्यांनी हे पाप केले अशा तत्कालीन लोकप्रतिनिधिच्या व पालकमंत्री यांच्या कानफाटात लावली पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
चाफळ / मल्हारपेठः चाफळ येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय 18) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. अनिकेत मोरे (22, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणार्या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत पोलिसांत जावून हजर झाला आहे. त्याने गुन्...
शाळा बंद पण शिक्षण चालू या साठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.सभापती प्रणव ताटे उपसभापती रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी शाळा हा उपक्रम राबवला जात आहे.अध्यन साहित्य विध्यार्थ्यांना घरी पुरवून पालकांच्या सहाय्याने शिक्षण सुलभ होण्यासाठी या उपक्रमाद्वारे प्रयत्न होत आहेत.
डोळ्याचे पारणे फेडणारे विविध जातीचे श्वान अनेक जातीचे,विविध आकाराचे,केसाळ लांब कानाचे मजबूत शरीर यष्टीचे असे अनेक श्वान येथे पाहायला मिळत होते.मालकांचे प्रेम आणि श्वानांची चपळता हे पाहणे ही पर्वणी होती ग्रामीण भागात हे पाहायला मिळाल्याने लोकांचा आनंद ओसंडून वाहत होता.
कराड ः बेळगाव कर्नाटक येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजगौरव पुरस्कार या वर्षी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र चे सचिव रामकृष्ण वेताळ यांना देण्यात आला.5 सप्टेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या समारंभात माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या वेळी खासदार अमरसिंह पाटील,ब्रि...
अंदोरी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील रुई येथील चिमुकले भाऊ व बहिण शनिवारी दुपारपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध कुटुंब, ग्रामस्थ व पोलीस शोध घेत होते. परंतु, दुदैवाने दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह निरा कालव्यात व चव्हाण वस्तीजवळ सापडले. आशिष प्रशांत राणे व ऐश्वर्या प्रशांत राणे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कराड : दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करून मातेने स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कराड शहरात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून मातेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालेल्या पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याची चिट्ठी त्या महिलेने लिहून ठेवली असून पो...
कराड ः वारूंजी ता. कराड येथे घरामध्ये महिलेसह दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिला व बालक भाडेतत्वावर वारूंजी येथे ...
कराड : स्वर्गीय माजी खासदार आनंदराव चव्हाण काका व स्वर्गीय माजी खासदार प्रमिलाताई चव्हाण काकी व स्वर्गीय रामचंद्र राघोजी पाटील (दादा)यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त प्रेमिलाकाकी माध्यमिक विद्यालय विजयनगर ता.कराड येथे स्व. काका-काकी व दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मृतीदिना निमित्ताने वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील (नान...
कराड, ः गोवारे-चौंडेश्वरीनगर येथे डोक्यात दगड घालून युवकाचा निर्घृण खून झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. किरण लादे (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खून मागचे कारण व हल्लोखोरांचा तपास पोलीस करत आहेत. खून झालेल्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या उपजिल्हा रुग्...
कराड : आठ महिने वयाच्या मुलास पोटाला बांधुन २३ वर्षीय महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना कासारशिरंबे ता. कराड येथील पालकराचा मळा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. राजश्री शंकर रासकर वय २३, मुलगा शिवतेज वय ८ दोघे रा. कडेगाव जि. सांगली अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत वनिता बबन दगडे वय ४० रा. काटकर मळा, कासारश...
शेतक-यांना समजून घेवून, निर्णय घेवून राबविले नाहीत तर शेतक-यांचा दिल्लीला पडलेला वेढा प्रत्येक राज्यात पडेल व सध्या केंद्र सरकारला शेतक-यांनी वेढीस धरले आहे. याचा आनंद मानणारे कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस इत्यादी विरोधकांनाही शेतक-यांचा वेढा पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकारला शेतक-यांच्या आंदोलनाची झळ बसलेली नाही.महाराष्ट्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील. महाराष्ट्र सरकारच्या आमदार, मंत्री, सरकारी अधिकारी यांचेपेक्षाही शेतक-यांना स्वत
उंब्रज पोलीस स्टेशनने सन 2020 मध्ये सुमारे 137 दारूच्या रेड करून 22 लाख 34 हजार 771 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सन 2021 मध्ये 10 जून अखेर 75 दारू रेड करून सुमारे 4 लाख 30 हजार 436 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ह्या आठवड्यात पाली, मसूर, उंब्रज, इंदोली, तारळे भागात कारवाई करून 72 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.
पॉझिटीव्ह दर काहीसा कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनानुसार नव्याने आदेश जारी केले आहेत. कोविड बाधितांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा चौथ्या स्तरात असून त्यानुसार निर्बंध काहीसे सैल केले आहेत.
जिल्ह्याच्या विविध भागाला आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहिले. उंब्रजजवळील चोरे येथे घरात पाणी शिरले तर मांडवे येथे ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली.
जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधित संख्येमुळे लॉकडाऊन कडक करणे प्रशासनाला गरजेचे होते. परंतु यामधून किराणा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळायला हवी जेणेकरून सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढला जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी सुद्धा दुकाने सुरु झाल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्बधांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळात नियमांचे पालन करणे हेच सर्वांच्या हातात आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
विजयनगर ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या विलगीकरण कक्षात उपलब्ध सोयी, सुविधा व उपचार पहाता हे विलगीकरण कक्ष रोड मॉडेल - माजी आमदार आनंदराव पाटील
वडूज परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना आज मॉर्निंग वॉक चांगलेच महागात पडले. विनामास्क व विनाकारण सकाळी फिरल्याच्या कारणावरून पोलीसांनी ५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. आज पहाटे वडूज शहर परिसरातील पेडगाव रोड, भागांत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व नियम मोडणाऱ्या नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी ...
फलटण व माण तालुक्यात करोना उपचारासाठी जंबो हॉस्पिटल होण्यासाठी सूचना केली आहे. त्यासाठी पाच दिवसात इ-टेंडर नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश पवार यांनी देत मनुष्यबळ आणि सुविधा देत आहोत त्यामुळे कामाचा रिझल्ट दिसलाच पाहिजे अन्यथा कामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
वाई, दि. २८: भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यावर महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना करीत आहे. आपल्या सातारा जिल्हयातही कोरोनाचा कहर सुरू आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हयात कडक लॉकडाउन केलेले आहे. या कोरानाचा पार्श्वभुमीवर आज वाई नगरपरिषदेची विशेष सभा व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडली. पहिल्यांदाच या कठीण परिस्थितीमध्ये दोन्ही आघाड्यांनी गट-तट न पाह...
पिंपरे बु॥ ता खंडाळा येथील कापसेवस्ती येथे बांधकाम उद्योजक विलास यादव यांच्या फार्म हाऊसवर ग्रामस्थाच्या वतीने लोकसहभागातुन कोरोनाबाधित रुग्णासाठी सुसज्ज असे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पिपंरे बु॥ गावचे युवा नेते संभाजी घाडगे यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन बैठकीत खटाव प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी रस्त्याकडेला असणारी झुडपे काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने अजून काहीच कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे. याबाबत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांना संपर्क साधला असता या संदर्भात अहवाल मागवून घेऊ तसेच प्रत्यक्षात कामास सुरुवात नसेल तर त्यांना पुन्हा एकदा या विभागाला सूचना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया श्रीफ कासार यांनी दिली
सातारा : सातारा जिल्ह्याला आतापर्यंत 72 हजार 890 कोव्हॅक्सिन व 6 लाख 29 हजार 270 कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली आहे. इथून पुढे उपलब्धतेनुसार पुरवठा करण्यात येईल हे सांगून भविष्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी घ्यावयाच्या खबरदारी व करावयाच्या उपाययोजना बाबत दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी केल्या. सातारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ...
सोनी मराठी वाहिनीवरील मालिका तू सौभाग्यवती हो ही प्रेक्षकांना आवडू लागली आहे, अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान यांची ही हळुवारपणे फुलत जाणारी प्रेम कहाणी आता रंगू लागली आहे. प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाला घेऊन काही स्वप्न असतात तशीच ऐश्वर्याची सुद्धा आहेत पण ऐश्वर्याचं हे लग्न चारचौघींसारखं नाही तर आगळंवेगळं आहे. वयाच्या, सामाजिक दर्जाच्या एकंदर सीमा ओलांडून हे लग्न होतं...
पुसेसावळी : महामारीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही समाजकारणाचा घेतलेला वसा सोडणार नाही. आम्ही पाठपुरावा केलेल्या कोरोना सेंटरचे धैर्यशील कदमांना श्रेय मिळेल या भितीने पुसेसावळीत कोविड सेंटरचे चोरीछुपे उद्घाटन करून कोरोना महामारीचे राजकारण करणाऱ्या मुजोर पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही असा घणाघाती टोला वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी ल...
दहिवडी ः माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमण्यात आलेल्या प्रशासक मंडळाविरूध्द उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्यानुसार माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या राज्यभर कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र उच्च न्यायालयाने निकाल दिलेल्या स...
मालखेड ता.कराड येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती ग्रामस्थांना दिली. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गावातील गर्दीची ठिकाणी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण कर...
फलटण : एका भेंडी विक्रेत्याला मोठा व्यापारी आला आहे त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायचे आहे असे फसवून त्यास मारहाण करून त्याचे कपडे कडून महिले बरोबर अश्लीलफोटो काढून ब्लॅकमेल करत 15 लाख 50 हजाराची खंडणी वसुली करणाऱ्या पाच जनाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तक्रारदारांना तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे
म्हसवड येथील कोवीड सेंटरला तीन लाख रुपये किंमतीचे बँकेकडून पहिले व्हेटिलेटर बायपॅप मशिन देण्यात आले आहे. येथील डॉक्टरांनी सहकार्य केले तर येथे जिल्ह्यातील एक आदर्श आयसीयु सेंटर उभारण्यासाठी जिल्हा बँक व देसाई कुटुंबाच्या माध्यमातून देण्यास मी तयार आहे. - अनिलभाऊ देसाई, संचालक, सातारा जिल्हा बँक
महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदारांपैकी कोरेगावच्या आमदार महेश शिंदेंचा नंबर लागतो. कोरेगाव मतदारसंघातील जनता त्यांना अक्षरशः देवदूत म्हणून ओळखते याच्याच पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत कोरोनाला थोपविण्यासाठी आमदार महेश शिंदे हे अहोरात्र आपल्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करीत आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांनी दोन भव्यदिव्य अशी कोविड हॉस्पिटल उभी करून को...
गेल्या काही दिवसांत दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असून, ही सकारात्मक बाब आहे. मात्र तज्ज्ञांनी पुन्हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून, या लाटेचा सामना करण्यासाठीही कृष्णा हॉस्पिटल सज्ज आहे. कोरोना साथीचे गांभीर्य ओळखून रूग्णांनी स्वत:च घरात उपचार घेत न बसता, दवाखान्याशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रूग्णालयात अथवा घरात उपचार घ्यावेत, डॉ. सुरेश भोसले, अध्यक्ष कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट
सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील ६ हजाराहून अधिक लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा त्यांनी गोंदवले येथे स्व खर्चाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव तसेच लॉकडाऊन मुळे। सर्वच ठिकाणचे व्यवसाय धंदे बंद असल्याने सर्व सामान्य लोकाचे जग...
"सध्या सातारा जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा असताना जनतेच्या सुरक्षिततेसाठी सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने त्वरित लस खरेदी करून लोकांसाठी लसीकरणाची सोय केली आहे. केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटलना लस खरेदीची परवानगी दिल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव खासगी रुग्णालय आहे ज्यांनी लस उपलब्ध केली आहे. " - विश्वजित डुबल, मार्केटिंग मॅनेजर
या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले २००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि अंबानी हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली आहे. - डॉ. वैशाली मोहिते
ढेबेवाडी खोऱ्यात आढळलेले कासव विदेशात सापडते. हे Red eared slider turtl सिंगापूरी वा मलेशियन कासव नावाने ओळखले जाते. ते जमिनीवर व पाण्यात राहणारे असून ते पाळण्यातही येते - डॉ. सुधीर कुंभार, वन्यजीव प्रेमी
दोनचं दिवसापूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर व त्यांचे सहकारी पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर व मनसैनिक यांनी पवनचक्की कंपन्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात अॉक्सिजन विथ व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था या पवनचक्की कंपन्यांनी करावी अशी मागणी केली होती. पाटण कोविड केअर सेंटरला रत्नागिरी विंड पॉवर प्रोज...
येथील नगरपालिका संचालित जीवनधारा कोविड सेंटर ची विनाकारण बदनामी केली जात आहे. ती थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन विटा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी प्रातांधिकारी संतोष भोर यांना निवेदन दिले आहे. प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व तालुका प्रशासनाच्या आग्रहामुळे तालुका व विटा शहरातील कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था व्हावी. यासाठी ...
मातृभूमीशी ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी... वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर शहरी भागांत वैद्यकीय व्यवसायाच्या चांगल्या संधी होत्या, मात्र आपल्या ग्रामीण भागाशी असणारी नाळ कायम ठेवण्याचे संस्कार आई वडीलांनी दिले होते. त्यामुळे आपल्या मातृभूमीशी असणारे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी अवघ्या ३० दिवसांत हॉस्पिटल व कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली असल्याचे डॉ. सचिन साळुंखे यांनी सांगितले.
पाटण/प्रतिनिधी पाटण तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घालून कोरोना बाधितांचा व मृत्यू चा आकडा दिवसेन् दिवस वाढत आहे. तालुक्यामध्ये डोंगरपठारावरती पनामा, रत्नागिरी, सुझलॉन व अन्य पवनचक्की कंपन्यांनी आपले टॉवर उभारणी करुन कोठ्यावधीची माया जमा केली आहे. तालुक्यातील जनतेसाठी त्यांनी पुढाकार घेऊन आँक्सिजन विथ व्हेंटिलेटर बेडचे कोविड सेंटर तात्काळ उभारावं अशी मागणी मनसेचे पाटण त...
सातारा : सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सातारा जिल्हा बँकेचे प्रॉपर्टी विभागाचे अधीक्षक विश्वजित राजुरकर यांची निवड सर्वानुमते बिनविरोध झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमित काळे, माजी चेअरमन उद्धव देशमुख, संजय मांढरे, यशवंत मेंगडे, विश्वास गायकवाड, ...
रासायनिक खतांची भाव वाढ झालेणे बळीराजा चे आर्थिक नियोजन बिघडले आहे. त्यामुळे सदर दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणा विरुद्ध युवक काँग्रेस आंदोलन उभारेल असा इशाराही दिला आहे . याबाबत केंद्रीय खते व रासायनिक मंत्री याना पत्र देऊन रासायनिक खतांच्या किमती त्वरीत कमी करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे निलेश काटे यांनी सांगितले.
खटाव तालुक्यातील गावांना विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला तालुक्यातील ग्रामपंचायतींनी साथ दिली असून आता पर्यंत तालुक्यातील ८६ बाधित गावांपैकी ७१ गावात विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. तसेच उर्वरित गावांनीही विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया राबविल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली. तालुक्यात कोरोना बाधित रूग्णां...
वडूज शहरातील तसेच प्रभागातील नागरिकांना उपचार वेळेत मिळावे यासाठी स्व खर्चातून मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून लवकरच मोफत रुग्णवाहिका सुरू करणार असल्याचे माजी स्वीकृत नगरसेवक काकासाहेब बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सदैव संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग अशी ख्याती झालेल्या महाराष्ट्र भर ख्याती झालेल्या रॉयल कारभार ग्रुपने वेगळा ठसा उमटवला आहे. याबाबत माहिती अशी की कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांना ओकक्सिजन बेड रेमडी सिवर व इतर आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नातेवायकाना धावाधाव करावी लागते याची जाणीव ठेवून तसेच नातेवाईकांच्या आग्रहाखातर रॉयल कारभार ग्रु...