sports

विदेशी प्रजातीचे कासव ढेबेवाडी खोऱ्यात आढळले


ढेबेवाडी खोऱ्यात आढळलेले कासव विदेशात सापडते. हे Red eared slider turtl सिंगापूरी वा मलेशियन कासव नावाने ओळखले जाते. ते जमिनीवर व पाण्यात राहणारे असून ते पाळण्यातही येते - डॉ. सुधीर कुंभार, वन्यजीव प्रेमी

ढेबेवाडी येथे वांग नदीच्या संगमाजवळ एका शेततळ्यात विदेशातील कासव सापडले असून ते सिंगापूर वा मलेशिया या देशात सापडणारे कासव असावे असे तज्ञानी सांगितले. असे कासव आपल्याकडे पहिल्यांदाच बघायस मिळाल्याने नवल व्यक्त केले जात आहे. शेततळ्याचे मालक चंद्रहास पाटील यांनी हे कासव ढेबेवाडी वन्यजीव विभागाकडे सुपूर्द केले. याबाबत अधिक माहिती अशी गुढे ता.पाटण येथिल शेतकरी चंद्रहास पाटील यांनी आपल्या वांग नदी शेजारील क्षेत्रात सहकारी अमोल नलवडे यांच्या साह्याने शेततळे तयार करून यामध्ये मत्सशेती केली आहे. या तळ्यातील मासे आता मोठे झाले आहेत ते काढण्यासाठी बुधवार दि 19 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते दोघे गेले होते,मासे काढताना त्यांना कासव दिसून आले.असे कासव आपल्याकडे प्रथमच दिसून आले असल्याने त्यांना नवल वाटले सहकारी अमोल नलवडे यांनी लगेच ढेबेवाडी वन्यजीवचे अमृत पन्हाळे याना सम्पर्क करुन त्यांच्याकडे कासव सुपूर्द केले.अमृत पन्हाळे म्हणाले की,याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली आहे.कासव सध्या वनविभागाचे सर्किट हाऊस येथे ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करणार आहोत.