कॉंग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोर्याने मते मिळवली. परंतु पाटण खोर्यातील जनतेकडे साफ दुर्लक्ष केले, अशी टीका महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच देशाची उन्नती साधणार्या भाजप सरकारला सत्ता देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
इयत्ता दहावीच्या निरोप समारंभादिवशीच मोटरसायकल व जीपच्या अपघातात मरळी (ता.पाटण) येथील एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
मंद्रुळहवेली येथील कोयना नदीत एकजण बुडाला आहे. याबाबत गेल्या तीन दिवसापासून शोधमोहिम सुरू असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मंद्रुळहवेलीच्या यात्रेदिवशीच हा प्रकार झाल्याने नदीकाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
मारूल हवेली, ता. पाटण गावच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची तक्रार मल्हार पेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संजीव पांडुरंग मोरे आणि बाबुराव पांडुरंग मोरे या दोन बंधूंनी भुडकेवाडी (वरची), ता. पाटण येथे सोनाई निवास नावाचे घर बांधले आहे. यातील संजीव मोरे हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्य करतात तर बाबुराव मोरे सातारा येथे वास्तव्य करतात.
कराड- पाटण मार्गावर विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत मारूती सुझूकी कंपनीची डीझायर गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली.
पाटण, ता. पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार अज्ञात इसमांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पाटण तालुक्यात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 31 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पाटण, ता. पाटण येथून घरकाम करणाऱ्या एका महिलेने ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अंधारवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच धोंडीराम बर्गे यांना राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणार्या लढ्यातील एक नेतृत्व असलेले डॉ भारत पाटणकर यांची पुणे येथे होणार्या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
वाहनाने धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चालकावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
र्यावरण पूरक कृषी व औद्योगिक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचा दि.15 सप्टेंबर रोजी कराड येथील पलाश मंगल कार्यालयामध्ये वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोयना धरण पाणलोट क्षेत्राात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात धरणात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात 68.89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. विभागातील जाळगेवाडी खालची-वरची, गमेवाडी, माथणेवाडी व माजगांव गावातील एकुण १५ बंद घरे फोडून १४.५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
कोयनानगर येथील बसस्थानकाजवळ डिस्कवर कोयना पथकाच्या सदस्यांना दुर्मिळ असणारा पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप आढळला. या सापाची मादी पावसाळ्यात तीन ते सहा अंडी घालते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे या सापाच्या दंशाचे प्रमाणही कमी आहे. याचा दंश झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात.
चाफळ, ता. पाटण विभागातील सडावाघापूर येथील उलटा धबधबा प्रसिध्द झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरण अन् उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आता याठिकाणी आनंद घेण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता प्रत्येक माणसी वीस रुपये मोजावे लागणार आहेत.
पाटण येथे बेवारस मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. काही विभागात पुरेसा पाऊस पडला नसल्याने पेरणीसाठी घाई केलेल्या क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जून महिनाअखेरीस आला तरी पावसाचे आगमन झाले नाही, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
एसटी सेवा पूर्व पदावर आल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून प्रवीण मारुती पाटील, शंकर तावरे यांच्या अथक परिश्रमानंतर पाडळोशी-परेल बससेवा सुरू करण्यात आली आहे.
चव्हाणवाडी, ता.पाटण येथे एका अज्ञाताने शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत १३ गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या छप्पराला आग लागून त्यात असणाऱ्या म्हशीचाही भाजून मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाले.
बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी यात्रेनिमीत्त जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब जाईचीवाडी (बोंद्री) यांच्या वतीने येथील तुळजाईसिटी मैदानावर दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून आवसरी संघ जानाई-भैरवनाथ चषकाचा मानकरी ठरला.
सन 2022-23 वर्षासाठी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी ह.भ.प. आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शंकरराव मोहिते, उपाध्यक्षपदी संजय कांबळे व जयभीम कांबळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
कांदाटी खोऱ्यातील गावांमध्ये अभयारण्याचे असलेल्या गट नंबरची मोजणी करून नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे रासाठी, गोकुळ व शिवंदेश यांच्यावर पुनर्वसनाचा शासनाकडे गेलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार याप्रश्नी प्रधान सचिव पुनर्वसन यांनी २२ रोजी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे २१ मार्च रोजी होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
अल्पवयीन व मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी पिडीतेला बाहेर फिरायला व खायला देण्याच्या बहाण्याने नेवून हे कृत्य केले. याप्रकरणी पिडीतेच्या आईने पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 संशयित आरोपींना 12 तासातच अटक केली असून या अत्यंत संतापजनक घटनेमुळे पाटण तालुक्यासह जिल्हा हादरला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आता तिच्या नव्या लुकमुळे ती चर्चेत आली आहे.
रोमनवाडी (येराड) ता. पाटण येथे सख्खा बहिण-भावाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी १७ रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा संबंधित बहिण-भावाचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. या घटनेने रोमनवाडी, येराडसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
केर, ता. पाटण येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या संतापजनक घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणा जबाबदार असेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथे मध्यरात्री लक्ष्मण धोंडीबा देसाई यांच्या घरातील गोठ्यात शेळीवर रात्री १२ वाजता बिबट्याने हल्ला केल्याने शेळी जागीच ठार झाली आहे. शेळीचा धडपडण्याचा आवाज येताच आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. मात्र, तोपर्यंत शेळी जागीच ठार झाली होती.
रुवले (सुतारवाडी) ता. पाटण येथे एका नराधमाने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह डोंगरातील ओढ्यात टाकून दिला. बुधवारी 29 रोजी दुपारच्या सुमारास घडलेली घटना गुरूवारी ३० रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 12 तासाच्या आत नराधम संशयित आरोपीला अटक केली आहे.
नाव, ता. पाटण गावातील काही गावकर्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबर या वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हेळवाक वन्यजीव विभागाने धडक कारवाई करत ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांस व अन्य मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.
जावली तालुक्यातील केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्वाचा प्रश्न आहे. जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने एक वर्षाच्या आत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्यानंतर लोकांनी आरडा- ओरडा केल्यानंतर या बिबट्याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः निवासस्थानाच्या शेजारील लाॅनवरती असताना बिबट्याचा निवासस्थानी वावर होता.
कण्हेर, ता. सातारा येथील धरणातून वर उचलावयाचे सहा टक्के पाणी अडवून उताराच्या बंद पाईपलाईनने संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर (मरळी) येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई याची प्रमुख उपस्थिती होती.
भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सदर कारवाईत वनविभागाने संशयितांकडून ६ जिवंत हातबॉम्ब, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३० रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. तर आज रविवारी ३१ रोजी सकाळी त्या परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत.
तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या कासवाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे होते. मऊ पाठीच्या या कासवाचे शास्त्रीय नाव लिथस सॉफ्टशेल टरटल असे असून हे कासव गोड्या पाण्यातील सर्वात मोठे कासव आहे. याचे वजन ३० ते ३२ किलोपर्यंत वाढते. साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येत असल्याची माहिती वनरक्षक विलास वाघमारे यांनी दिली.
कोयना दूध संघ सहकारातील सर्वात जुना व सहकारी तत्वावर चालणारा पहिला दूध संघ आहे. माजी मंत्री कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या रूपाने संघाला चांगले नेतृत्व मिळाले होते. त्यामुळे संघाने अधिकाधिक नेत्रदीपक प्रगती केली आहे.
जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी मला तुमची शेवटपर्यंत साथ हवी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे प्रणेते व धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावच्या नागरिकांना केले.
पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रविवारी 24 रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
माजगाव (ता. पाटण) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची औजारे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
चाफळ / मल्हारपेठः चाफळ येथील स्वागत कामानीजवळच भरदिवसा एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या थरार नाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय 18) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. अनिकेत मोरे (22, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणार्या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत पोलिसांत जावून हजर झाला आहे. त्याने गुन्...
ढेबेवाडी खोऱ्यात आढळलेले कासव विदेशात सापडते. हे Red eared slider turtl सिंगापूरी वा मलेशियन कासव नावाने ओळखले जाते. ते जमिनीवर व पाण्यात राहणारे असून ते पाळण्यातही येते - डॉ. सुधीर कुंभार, वन्यजीव प्रेमी
दोनचं दिवसापूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर व त्यांचे सहकारी पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर व मनसैनिक यांनी पवनचक्की कंपन्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात अॉक्सिजन विथ व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था या पवनचक्की कंपन्यांनी करावी अशी मागणी केली होती. पाटण कोविड केअर सेंटरला रत्नागिरी विंड पॉवर प्रोज...
पाटण/प्रतिनिधी पाटण तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घालून कोरोना बाधितांचा व मृत्यू चा आकडा दिवसेन् दिवस वाढत आहे. तालुक्यामध्ये डोंगरपठारावरती पनामा, रत्नागिरी, सुझलॉन व अन्य पवनचक्की कंपन्यांनी आपले टॉवर उभारणी करुन कोठ्यावधीची माया जमा केली आहे. तालुक्यातील जनतेसाठी त्यांनी पुढाकार घेऊन आँक्सिजन विथ व्हेंटिलेटर बेडचे कोविड सेंटर तात्काळ उभारावं अशी मागणी मनसेचे पाटण त...
सातारा : तारळे, ता. पाटण येथील एका घरात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून शौचालय आणि कारमध्ये लपवून ठेवलेल्या 103 किलो वजनाच्या 836 जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या. याप्रकरणी गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भारतीय स्फोटक कायदा अन्वये गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आह...
कोयना भागातील रासाठी याठिकाणी काल एक लग्न पार पडले. त्या लग्नाचे काही फोटो व व्हिडिओ प्रशासनाच्या हाती लागल्याने पाटणचे अधिकारी थेट रासाठी या ठिकाणी पोहचले आणि लग्न मालकावरती दहा हजार रुपयांचा दंड केला. ही कारवाई तहसिलदार टोंपे, गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे यांनी केली. कोरोना काळामध्ये प्रशासन जीव ओतून काम करत आहे. लोकांना अनेक सोईसुविधा मिळत नाही. बेडवाचून अनेकांचे प्रा...
दै मुक्तागिरीने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा चांगलाचं इफेक्ट झाला असून मोकाट फिरणार्या युवकांवरती चांगलाचं चाप बसला आहे. गुरेघर धरणालगत असणार्या "जन्नत पोईंट" वरती अधिकार्यांच्या करड्या नजरेने आज दिवसभर मोरणा भागात स्मशान शांतता पसरली. सदर पोईंटजवळ फ्लेक्स चिकटवून व दिसणार्यांवरती कारवाई केल्याने लोकांमधून समाधान व्यक्त केले गेले. गुरेघर धरणा लगत असणार्या पाण्या साठा खड्...
पाटण तालुका आरोग्याच्या बाबतीत इतका मागास कसा राहिला? एक व्हँटिंलेटरचे अद्यावत हॉस्पिटल या तालुक्यात नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच जाणिवेतून पाटण ला तहसिलदार म्हणून रुजू झाल्यानंतर कोरोना रुग्णानां कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी आपला एक महिन्याचा पगार कोविड रुग्णांसाठी दिला. या गोष्टीमुळे पाटणवासीयांनी त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला.
पाटण तालुक्यातील नेचल (हेळवाक) येथे बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे डबर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करून मिळवले जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पाटण तालुका अध्यक्ष गोरख मारुती नारकर यांनी पाटणचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेचल (हेळवाक) येथील बंधारा या...
या विभागातील अनेक गावांतील पाळीव प्राण्यांवर बिबटयाने हल्ले करुन त्यांना ठार केल्याचे प्रकार सतत घडत आहेत. यापूर्वी बिबटयाचा वावर होता परंतू पुरावा नव्हता. रात्री बिबटयाला पळवून लावताना त्याचे मोबाईलवरुन फोटो काढण्यात यश मिळाले. - संजय पाळेकर, प्रत्यक्षदर्शी
‘पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून, ही कामे दर्जेदार करून पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आज केले.
मळ्याचे दोन ठिकाणी गाव वसणार आहे तो ठराव पूर्ण झालेला आहे. कोळणेचा ठराव अंतिम टप्प्यात आहे तर गावला पसंत असणार्या व शिल्लक असणार्या जमिनी आम्ही देतो जमिनी देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत आम्ही देतो व प्रस्ताव पूर्ण करून देतो. मळे गावाचा सर्वे लवकरचं पूर्ण करतो तो प्रस्ताव नागपूरला जाऊन लवकरचं पूर्ण करुन मार्च अखेर पूर्ण करतो. संकलनाच्या त्रुटी महसूल पूर्ण करतो. मुल्यांकनातील त्रुटी दूर करतो. मुल्यांकनातील त्रुटींचा समितीच्या बैठकिमध्ये अंतिम निर्णय होईल. - महादेवराव मोहिते, वनविभाग अध
तीन दिवसानंतर मुळगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या लगत असणारे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे भलेमोेठे झाड बाजूला केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली.
डाॅ.सदीप डाकवे यांचे ‘दीप उजळतो आहे’ हे तिसÚया क्रमांकाचे पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.शंभूराज देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते केले होते. दुसÚया पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले होते.
कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे
कोरोनाने पाटण शहरामध्ये चांगलाच तळ ठोकला असून पाटणची साखळी वाढतचं चाललेली आहे. कोरोना बाधित लोकांची सोर पाटण मधील चार कोविड सेंटरमध्रे केली जात आहे. मात्र रा कोविड सेंटर मधील उपद्रवी हुल्लडबाज तरुण इथंही आपल्रा अवगुणांचे चित्रण करुन प्रशासनास नाहक त्रास देत आहेत.