maharashtra

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात क्रीडा स्पर्धा

उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते व शहर संघटक सादिक बागवान यांची माहिती

Sports competition in Satara on the occasion of Aditya Thackeray's birthday
पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात सैनिक स्कूल मैदान क्रीडा स्पर्धा अन रक्तदान शिबिर यांचं आयोजन 13 जून रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते व क्रीडा संघटक सादिक बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात सैनिक स्कूल मैदान क्रीडा स्पर्धा अन रक्तदान शिबिर यांचं आयोजन 13 जून रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते व क्रीडा संघटक सादिक बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सादिक बागवान पुढे म्हणाले, "कोरोनाच्या दोन वर्षानंतर प्रथमच शैक्षणिक वर्ष चालू होतं आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा स्पर्धा होणार आहेत. कबड्डी, हॉकीसह मैदानी खेळ आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा राज्यस्तरीय होणार असून येथील सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्यासाठी मेडल मानचिन्ह देणार आहे. या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्याचे नियोजन असेल. अन या स्पर्धा दरवर्षी होतील. मिनी ऑलम्पिकच्या धर्तीवर या स्पर्धा होणार असून राष्ट्रीय दर्जाच्या हॉकी मॅच घेण्याचेही नियोजन आहे. यंदा स्पर्धा आयोजनाचे पहिले वर्ष आहे. शिवसैनिकांनी स्वतः या स्पर्धांचे प्रायोजकत्व स्वीकारले असून या स्पर्धा आम्ही निश्चित यशस्वी करू, असे सचिन मोहिते यांनी सांगितले. पावसाच्या शक्यतेचा विचार करून स्पर्धा छ. शाहू स्टेडियम येथे होतील. अन्यथा स्पर्धा सातारा सैनिक स्कूल येथेच होईल. बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा शिवाजी मंडळ येथे होणार असून खेळाडूंना राहण्याची व्यवस्था क्रीडासंकुल येथे असेल, अशी माहिती सादिक बागवान यांनी दिली.