सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जमा केला दणकेबाज महसूल
तब्बल 123.23 कोटी झाले शासकीय तिजोरीत जमा
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दणकेबाज महसूल जमा करीत शासनाच्या तिजोरीत 123.23 कोटी रुपयांची भर टाकली आहे.
सातारा : सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दणकेबाज महसूल जमा करीत शासनाच्या तिजोरीत 123.23 कोटी रुपयांची भर टाकली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरातील वाढत्या वाहनांमुळे आणि सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध माध्यमातून दणकेबाज महसूल जमा केला आहे. शासनाच्या तिजोरीत त्यामुळे तब्बल 123.23 कोटींची भर पडली आहे.
1) महसुल वसुली :- नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तब्बल 123.23 कोटी इतका महसूल जमा केलेला आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षी 90.41 होता. त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते
2) तपासणी पथकाची कामगिरी :- तपासणी पथकांची कामगिरीचा आलेख मोठ्या प्रमाणावर उंचावल्याचे दिसून येते. तपासणी पथकांना देण्यात आलेल्या लक्षांकाच्या तुलनेत प्रत्यक्ष कामगिरी ही 112 टक्के इतकी झाली आहे. तपासणी पथकाकडून मोठ्या प्रमाणावर वाहन तपासणी करण्यात आली त्यामध्ये 5,763 वाहनांवर कारवाई करुन दंड व कर मिळून 5 कोटी 32 लाख इतका महसूल जमा झालेला आहे.
3) थकित मोटार वाहन कर वसूली :- थकित मोटार वाहन कर वसूलीसाठी कार्यालयाने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. तसेच कार्यकारी अधिकारी निहाय लक्षांक देणे व विशिष्ट विभाग नेमूण देणे अशा प्रकारची कार्यवाही केल्यामुळे थकित मोटार वाहन कर वसूली 12 कोटी 92 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. 12 हजार पेक्षाही जास्त वाहन धारकांना कर मागणीपत्र पाठवून वसूलीचे प्रयत्न केले आहेत.
4) थकित पर्यावरण कर :- थकित पर्यावरण कर वसूलीसाठी मोठ्या प्रमाणावर कर मागणीपत्र जारी करण्यात आले. 50,000 पेक्षाही जास्त वाहन धारकांना बजावणी करण्यात आली सन 2020-21 मध्ये 2 कोटी वसूली झाली होती. त्यामध्ये या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन 3 कोटी 44 लाख इतकी वसुली झाली आहे.
यापुढील काळात कर मागणीपत्र जारी करुनही ज्यांनी कर भरणा केलेला नाही ती प्रकरणे न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहेत.
5) आकर्षक क्रमांक :- आकर्षक क्रमांकाचाही विचार करता यावर्षी मोठ्या प्रमाणावर महसूल वाढलेला दिसून येतो. सन 2020-21 मध्ये 2.26 कोटी असणार्या महसूलात 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन 8.6% कोटी (3 कोटी 67 लाख) इतका महसूल झाला आहे.
6) नविन वाहन नोंदणी व वाहन संख्या :-
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 33,103 इतक्या नविन वाहनांची नोंद झालेली आहे. त्यापैकी 23 हजार 547 या दुचाकी दिसून येतात.
दिनांक 31 मार्च 2022 रोजी सातारा कार्यालयाच्या अभिलेखावरील एकूण वाहन संख्या ही 9 लाख 1 हजार 363 इतकी असून त्यामध्ये सर्वाधिक 6 लाख 97 हजार 107 दुचाकी आढळून येत आहेत.