maharashtra

अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अवैधरित्या गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक मार्च रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान मायणी दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश दत्तात्रय सूर्यवंशी हे पेट्रोलिंग करत असताना अक्षय तुकाराम माने विनोद सदाशिव माने, संदीप शिवाजी घाडगे तिघेही रा. मायणी, ता. खटाव हे मायणी ते अनफळे जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदा, विनापरवाना पिकअप मधून गौण खनिज वाळूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक बी. डी. माने करीत आहेत.