sports

पवनचक्की कंपन्यांनी पुढाकाराने कोविंड सेंटर उभारावे: गोरख नारकर

तालुक्यातील जनतेसाठी आँक्सिजन/ व्हेंटिलेटर बेडचे सेंटर उभारावे; मनसे ची आग्रही भूमिका; पवनचक्की कंपन्यां विरोधात मनसेआक्रमक पवित्रा घेणार

पाटण/प्रतिनिधी पाटण तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घालून कोरोना बाधितांचा व मृत्यू चा आकडा दिवसेन् दिवस वाढत आहे. तालुक्यामध्ये डोंगरपठारावरती पनामा, रत्नागिरी, सुझलॉन व अन्य पवनचक्की कंपन्यांनी आपले टॉवर उभारणी करुन कोठ्यावधीची माया जमा केली आहे. तालुक्यातील जनतेसाठी त्यांनी पुढाकार घेऊन आँक्सिजन विथ व्हेंटिलेटर बेडचे कोविड सेंटर तात्काळ उभारावं अशी मागणी मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. निवेदनामध्ये असे म्हणले आहे कि, पाटण तालुका हा दुर्गम व डोंगरी असून सोईसुविधांचा अभाव आहे. डोंगर पठारावरती पवनचक्की कंपन्यांनी गोरगरिब जनतेला लुबाडून कवडीमोल किंमती मद्ये जमिनीची खरेदी केली. "आवळा देऊन कावळा घेणं" अश्या प्रवृत्तीने या कंपन्यांनी हौदोस माजवला होता आणि अजून ही त्याच्या झळा काही प्रमाणात आहेतचं. या कंपन्यांचा सीएस आर फंड किंवा इतर योजनांच्या माध्यमातून फंड येत असतो आणि निरनिराळे उपक्रम ही होत असतात. सद्या तालुक्यातील गंभीरपरिस्थिती पाहता या पवनचक्की कंपन्यांनी स्व:त पुढाकार घेऊन तालुक्यातील जनतेसाठी अद्यावत कोविड सेंटरची उभारणे करणं गरजेचे आहे. पवनचक्की टॉवरची उभारणी करत असताना शासनाच्या अनेक नियम अटींची पूर्तंता करुन शासनाची सबसिडी मिळवण्यासाठी लोकांच्या हिताच्या गोष्टी व आरोग्य सुविधांची पूर्तंता करू असं लेखी शासनाला कंपनीने दिलेले आहेत. सदर कंपन्यां आपला स्वार्थ साधून घेऊन ज्यांच्या जिवावरती हा स्वार्थ साधला त्यांच्या जिवन मरणाच्या प्रश्नावरती आत्ता मूग गिळून बसलेल्या आहेत. सीआर एस फंड असो किंवा अन्य योजनांच्या माध्यमातून छोटे मोठे कार्यक्रम घेणं, उच्च स्तरीय अधिकारी वर्ग आणि शासकिय अधिकार्यांना बोलावणे फोटोसेशन करणं. लोकांना फसवायचे धंदे या कंपन्यांचे आहेत. असले उद्योग करण्यापेक्षा गोरगरिब जनतेच्या सेवेत या आणि खर्या अर्थाने मदत करावी. सदर पनामा, रत्नागिरी, सुझलॉन आणि इतर पवनचक्की कंपन्यांनी त्वरित सर्व सोईयुक्त अद्यावत कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करावं. येणार्या आठ दिवसात या कंपन्यांशी चर्चा करावी आणि पंधरा दिवसात कोविड सेंटर उभारणीला सुरुवात करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा घेईल अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सातारा, उपविभागिय अधिकारी पाटण, तहसिलदार पाटण यांना केलेली आहे.