maharashtra

इंदोलीत अज्ञाताने ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवला


इंदोली येथे मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये नवा कोरा ट्रॅक्टर जळून खाक झालाय. दरम्यान ही आग कोणी लावली याबाबत उलटसुलट चर्चा सुरुवात झालीय. ऊस दर प्रश्नांवर शेतकरी संघटनांनी गनिमी कावा सुरू केल्याच शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे.

उंब्रज : इंदोली येथे मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये नवा कोरा ट्रॅक्टर जळून खाक झालाय. दरम्यान ही आग कोणी लावली याबाबत उलटसुलट चर्चा सुरुवात झालीय. ऊस दर प्रश्नांवर शेतकरी संघटनांनी गनिमी कावा सुरू केल्याच शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे.
दरम्यान, बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान जयवंत शुगर या कारखान्याकडे ऊस घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला रस्तावरच अज्ञातांनी आग लावली. या आगीत ट्रॅक्टर जळून खाक झालाय. उंब्रज पोलिसांनी पंचनामा करून सदर ट्रॅक्टर ताब्यात घेवून तो उंब्रज पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलाय. यासंदर्भात शेतकरी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. सकाळपर्यंत उंब्रज पोलिसात याबाबत फिर्याद दाखल नव्हती परंतु संशयित म्हणून स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.