By वडूज प्रतिनिधी I आकाश यादव Sun 30th May 2021 01:10 pm
वडूज परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना आज मॉर्निंग वॉक चांगलेच महागात पडले. विनामास्क व विनाकारण सकाळी फिरल्याच्या कारणावरून पोलीसांनी ५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. आज पहाटे वडूज शहर परिसरातील पेडगाव रोड, भागांत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व नियम मोडणाऱ्या नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी कारवाई केली. शासनाच्या निर्बंधाचे पालन न करणाऱ्यांची दिवसाची सुरुवातच आज अश्या प्रकारे दंडात्मक कारवाईने झाली. पोलीसांनी ५६ नागरिकांवर कारवाई करून २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत पोलीस कर्मचारी चंद्रकांत वाघ, श्री. वाघमारे, रेखा खाडे, अश्विनी देशमुख, आण्णा मारेकर, सागर लोखंडे, संदिप शेडगे, दिपक देवकर, दऱ्याबा नरळे, गणेश शिरकुळे, भुषण माने, सत्यवान खाडे, अजय भोसले सहभागी झाले होते.