sports

स्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण


कराड : स्वर्गीय माजी खासदार आनंदराव चव्हाण काका व स्वर्गीय माजी खासदार प्रमिलाताई चव्हाण काकी व स्वर्गीय रामचंद्र राघोजी पाटील (दादा)यांच्या संयुक्त स्मृतिदिनानिमित्त प्रेमिलाकाकी माध्यमिक विद्यालय विजयनगर ता.कराड येथे स्व. काका-काकी व दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मृतीदिना निमित्ताने वृक्षारोपण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील (नाना), गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, प्रेमीलाकाकी माध्यमिक विद्यालयाचे सचिव प्रतापसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य विजयराव चव्हाण, उधोजक आर.टी. स्वामी, सहा. वनरक्षक किरण कांबळे, सह.वनरक्षक विलासराव काळे,अतिरिक्त वनक्षेत्रपालअर्जुन गमरे,वनरक्षक अशोक मतब,रमेश कुंभार, लोकनियुक्त सरपंच मा.संजय शिलवन्त, उपसरपंच विश्वासराव पाटील,ग्राम विकास अधिकारी आवळे ए. पी. उपस्थित होते. माजी वनसंरक्षक किरण कांबळे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने विद्यालय व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी केले तर आभार विकास कांबळे यांनी मानले.