sports

भेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली

पाच जणांवर गुन्हा दाखल

फलटण : एका भेंडी विक्रेत्याला मोठा व्यापारी आला आहे त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायचे आहे असे फसवून त्यास मारहाण करून त्याचे कपडे कडून महिले बरोबर अश्लीलफोटो काढून ब्लॅकमेल करत 15 लाख 50 हजाराची खंडणी वसुली करणाऱ्या पाच जनाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तक्रारदारांना तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे

फलटण : एका भेंडी विक्रेत्याला मोठा व्यापारी आला आहे त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायचे आहे असे फसवून त्यास मारहाण करून त्याचे कपडे कडून महिले बरोबर अश्लीलफोटो काढून ब्लॅकमेल करत 15 लाख 50 हजाराची खंडणी वसुली करणाऱ्या पाच जनाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तक्रारदारांना तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातील तक्रारदार यांनी दिनांक १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हे त्याच्या दुकानाच्या गाळयात बसलेले असताना अजीत घोलप (रा. नागेश्वर नगर चौधरवाडी,फलटण) याने मानस प्लाझा बील्डींग लक्ष्मीनगर फलटण येथे एक भेंडीचा व्यापारी आलेला आहे तो भेंडी घेणार आहे असे सांगून त्याच्या मोटारसायकल वरून फिर्यादीला घेवून गेला तेथे पोहोचताच एक मुलगी ,राजू बोके , मनोज हिप्परकर , रोहीत भंडलकर (रा फलटण)हे देखिल तेथे बसलेले होते त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची कपडे काढून मुलीच्या अंगावर ढकलून देत अश्लील फोटो काढले तेथून त्याला अजित घोलप व विजय गिरी गोसावी यांनी गिरवीरोडला जाणाऱ्या ओढ्यात जबरदस्तीने मोटार सायकल वर बसवून घेवून गेले व तेथे राजू बोके , मनोज हिप्परकर , रोहीत भंडलकर हे देखिल त्यांचे स्कुटी मोटार सायकल वरून तेथे आले व त्या सर्वानी फिर्यादी यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण , दमदाटी केली व रोहीत भंडलकर याने फिर्यादी यांचे तोंडात लघवी केली.

त्यावेळी बाकीचे लोकांनी त्यांना धरून ठेवले होते व म्हणाले की तुला आत्ता पोलीस स्टेशनला घेवून जातो व त्या मुलीला तुझ्या विरूध्द बलात्काराची तक्रार देण्यास सांगतो असे म्हणत पीडिताकडे 20 लाखाची खंडणी मागितली पीडित व्यक्ती इज्जत जाईल व बदनामी होईल या भितीने त्यांना १५ लाख ५० हजार रूपये दिले पीडितास पोलीसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हयची नोंद केली असून पुढील तपास पोउनि बनकर करीत आहेत . दरम्यान जर अशा प्रकारची घटना कोणाबरोबर घडली असल्यास त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांनी केले आहे.