गोडोली परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अतिक्रमण करणे, साहित्य चोरून नेणे तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्यासह वीस ते २५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एकास खंडणी मागितल्या प्रकरणी दोघा जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हॉटेल मालकास मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायत गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटींची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करुन खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बेदम मारहाण केली. तसेच कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
बिअर बार चालकास खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दमदाटी करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एका वैद्यकीय व्यवसायिकास खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा बसस्थानकाबाहेर राखी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या स्टॉल चालकांनी 3 हजार रुपयांप्रमाणे खंडणी द्यायची, अन्यथा अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने साहित्याची तोडफोड करत राडा घातल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले.
दारु पिऊन गोंधळ करणार्या चौघांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले असता, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांनी पोलिसाला धक्काबुक्की केली. ही घटना दि. 3 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सातारा शहरालगत महामार्गावरील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी चारही युवकांना अटक केली आहे.
अपहरण व खंडणी प्रकरणातील पाडळी, ता. सातारा येथील युवकाला बोरगाव पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले. शिवेंद्र राजेंद्र ढाणे असे त्याचे नाव आहे.
सातारा येथील पेढे व्यवसायिकाला गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय कॉल येत असून तीस लाखांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार, पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली.
फलटण : एका भेंडी विक्रेत्याला मोठा व्यापारी आला आहे त्याला तुमच्याकडून भेंडी घ्यायचे आहे असे फसवून त्यास मारहाण करून त्याचे कपडे कडून महिले बरोबर अश्लीलफोटो काढून ब्लॅकमेल करत 15 लाख 50 हजाराची खंडणी वसुली करणाऱ्या पाच जनाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तक्रारदारांना तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे
खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते.