maharashtra

खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा


एकास खंडणी मागितल्या प्रकरणी दोघा जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास खंडणी मागितल्या प्रकरणी दोघा जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 ऑगस्ट रोजी च्या साडेनऊ वाजल्यापासून ते 19 ऑक्टोबर च्या रात्री आठ वाजेपर्यंत वेळोवेळी आझम मोहम्मद शेख वय 55, राहणार कोरेगाव, तालुका कोरेगाव हे त्यांच्या घरी असताना अज्ञात महिला व अनोळखी इस्माने त्यांच्या मोबाईल क्रमांक वर फोन करून त्यांचे व्हाट्सअप मेसेज व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तसेच पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 30 हजार 350 रुपये खंडणी घेतली आहे. याबाबतची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस निरीक्षक सावंत अधिक तपास करीत आहेत.