दमदाटी करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दमदाटी करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास प्रीतम चंद्रकांत कळसकर रा. अयोध्या नगरी अपार्टमेंट, राधिका रोड, सातारा हे राजवाडा, मोती तळ्याच्या समोर असणाऱ्या सर्विसिंग सेंटर येथे उभे असताना अनिल उर्फ पप्पू बडेकर रा. मल्हार पेठ, सातारा याने कळसकर यांना फोन केला. यानंतर बडेकर यांनी कळसकर यांच्या येथे येऊन त्यांना दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास कळसकर यांनी नकार दिल्याने बडेकर यांनी कळसकर यांची कॉलर पकडून कसे पैसे देत नाही ते बघतो. नाहीतर तुझे हात-पाय तोडून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच तू पोलिसाकडे गेलास तर तुझ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत कळसकर यांच्या गाडीवर दांडके मारून गाडीचे नुकसान केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


