दारु पिऊन गोंधळ करणार्या चौघांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले असता, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांनी पोलिसाला धक्काबुक्की केली. ही घटना दि. 3 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सातारा शहरालगत महामार्गावरील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी चारही युवकांना अटक केली आहे.
सातारा : दारु पिऊन गोंधळ करणार्या चौघांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले असता, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांनी पोलिसाला धक्काबुक्की केली. ही घटना दि. 3 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सातारा शहरालगत महामार्गावरील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी चारही युवकांना अटक केली आहे.
अनिकेत संजय भोसले (वय 23, रा. संभाजीनगर, सातारा), मयूर संजय लावंड (वय 24, रा. अमरलक्ष्मी चौक, सातारा), शुभम शिवाजी जाधव (वय 21, रा. निशिगंधा कॉलनी संभाजीनगर, सातारा), सूरज देवदास यादव (वय 23, रा. संभाजीनगर अजिंक्यतारा कॉलनी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीसराहुल खाडे, घाडगे, महिला पोलीस हर्षा गायकवाड हे अजंठा चौकामध्ये रात्री पावणेअकरा वाजता गस्त घालत होते. त्यावेळी प्रीती एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये संशयित दारु पिऊन मोठमोठ्याने दंगा करत होते. यावेळी महिला पोलीसाने संशयितांना तुमचे जेवण झाले आहे, तुम्ही बाहेर जा,’ असे सांगितले. यावरून चिडून जाऊन या युवकांनी गायकवाड यांच्यासोबत असलेले पोलीस राहुल खाडे यांची कॉलर पकडली, तर हवालदार घाडगे यांना धक्काबुक्की केली. संशयितांनी यावेळी पोलिसांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चारही युवकांना अटक केली.


