गोडोली परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अतिक्रमण करणे, साहित्य चोरून नेणे तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्यासह वीस ते २५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : गोडोली परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अतिक्रमण करणे, साहित्य चोरून नेणे तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्यासह वीस ते २५ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सागर शिवाजीराव साळुंखे (रा. सदरबझार) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ नोव्हेंबरला साडेचारच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, साळुंखे यांचे गोडोली परिसरात एक बांधकाम सुरू आहे. त्याजवळच खंदारे याने दोन गुंठे जागा खरेदी केली आहे. परंतु, प्रत्यक्षात जागेवर एकच गुंठा जमीन भरते. उरलेला एक गुंठा माझ्या बांधकामाच्या जागे आहे असे म्हणत त्यांनी त्रास द्यायला सुरवात केली. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी पत्रे लावत अतिक्रमण केले. तेथील साहित्य चोरून नेले तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली असे साळुंखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे बाळू खंदारे याच्यासह २० ते २५ जणांवर अतिक्रमण करणे, दरोडा व खंडणीच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.


