अपहरण व खंडणी प्रकरणातील पाडळी, ता. सातारा येथील युवकाला बोरगाव पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले. शिवेंद्र राजेंद्र ढाणे असे त्याचे नाव आहे.
सातारा : अपहरण व खंडणी प्रकरणातील पाडळी, ता. सातारा येथील युवकाला बोरगाव पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले. शिवेंद्र राजेंद्र ढाणे असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका युवकाने भावाच्या गुन्ह्याप्रकरणी जामीनापोटी शिवेंद्र ढाणे याच्या वडिलांकडून पाच हजार रुपये घेतले होते पाच ऐवजी ९ हजार रुपयांची मागणी करत शिवेंद्र ढाणे याने त्या युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण केली होती. याबाबतची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी शिवेंद्र राजेंद्र ढाणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला केवळ चार तासात अटक केली. ही कारवाई बोरगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, प्रशांत मोरे, दादा स्वामी यांनी केली. अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ करीत आहेत.