बिअर बार चालकास खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : बिअर बार चालकास खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागठाणे, ता. सातारा येथे हॉटेल मोगरा परमिट रूम बिअर बार आहे. दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पाच वाजता तेथीलच हनमंत हरिभाऊ नलवडे हा बारमध्ये आला. त्याने मॅनेजर सावंत यांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये खंडणी दिलीस तर तुला गावात कुणी त्रास देणार नाही. जर तू मला दहा हजार दिले नाहीत तर मी वेगवेगळ्या मित्रांना सांगून तुझा बार फोडीन, अशी धमकी दिली. यानंतर नलवडे पुन्हा साडेआठ वाजता आला आणि त्याने बार मध्ये येऊन दहशत माजवत 4 हजार 805 रुपये रोख व दारूच्या बाटल्या घेऊन जात जबरी चोरी केली आहे. याबाबतची फिर्याद गणेश राजाराम साळुंखे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास सपोनि मछले करीत आहेत.


