व्यावसायिकाचे अपहरण करून 20 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील दोघांना अटक
कुख्यात गुंड गज्या मारणेच्या टोळीतील चौघांना खंडणी विरोधी पथक-2 कडून अटक
शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायत गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटींची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करुन खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बेदम मारहाण केली. तसेच कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
सातारा : शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायत गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटींची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करुन खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बेदम मारहाण केली. तसेच कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार गज्या मारणे याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 ने बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी यांचे शुक्रवारी (दि.7) कात्रज येथील आय.सी.आय.सी.आय बँकेसमोरुन अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी दोन पथके तयार करुन 4 आरोपींना अटक करुन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका केली.
गजानन (गज्या) पंढरीनाथ मारणे (रा. हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरुड) व त्याचे इतर साथिदार रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), अमर शिवाजी किर्दत (रा. एम.आय.डी.सी. कोडोली ता. सातारा), हेमंत बालाजी पाटील (रा. बुरली ता. पलूस, जि. सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थ नगर, कोडोली, ता. जि. सातारा), एक अनोळखी महिला व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, अमर शिवाजी किर्दत, हेमंत बालाजी पाटील, फिरोज महंमद शेख यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे करीत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी गज्या मारणे व इतर आरोपींवर पुणे शहर, पुणे जिल्हा व इतर जिल्ह्यात खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण करुन खंडणी उकळणे, दरोडा, गर्दी मारामारी करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, पिस्टल बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी गज्या मारणे याच्यावर 31 गुन्हे, रुपेश मारणे याच्यावर 15 गुन्हे, सचिन घोलप याच्यावर 8 गुन्हे, हेमंत पाटील याच्यावर 5, तर अमर किर्दत याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, शैलजा जानकर,
पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, अविनाश लाहोटे, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, प्रमोद टिळेकर, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले, अकबर शेख पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.