maharashtra

खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर गुन्हा


सातारा बसस्थानकाबाहेर राखी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या स्टॉल चालकांनी 3 हजार रुपयांप्रमाणे खंडणी द्यायची, अन्यथा अ‍ॅट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने साहित्याची तोडफोड करत राडा घातल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा : सातारा बसस्थानकाबाहेर राखी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या स्टॉल चालकांनी 3 हजार रुपयांप्रमाणे खंडणी द्यायची, अन्यथा अ‍ॅट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने साहित्याची तोडफोड करत राडा घातल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जयवंत शिवदास कांबळे उर्फ जेके असे संशयित आरोपीचे नाव असून याप्रकरणी संजय जनार्दन पवार (वय 54, करंजे पेठ, सातारा) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 2 ते 6 रोजी या कालावधीत घडली आहे. तक्रारदार यांनी राखी पौर्णिमे निमित्त स्टॅन्ड समोर स्टॉल लावला आहे. यावेळी संशयित जेके तेथे आला व त्याने ’तुमच्या एकऐकाचे हातपाय तोडेन. तुम्हाला अ‍ॅट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवीन. प्रत्येकाने मला 3 हजार रुपये द्यायचे,’ असे म्हणत स्टॉलसमोर असलेली प्लास्टीकची खुर्ची रस्त्यावर आपटून त्याचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ’तुम्ही स्टॉलवाले पैसे देत नाही ना, तुम्ही कसा धंदा करताय तेच बघतो,’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली.
जेके वारंवार खंडणीसाठी त्रास देत असल्याने अखेर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.