गाळमाती च्या अवैधरित्या वाहतुक प्रकरणी मोठी कारवाई
सुमारे 1 कोटी 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
कोरेगाव डीवायएसपी व पुसेगाव पोलिसांच्या सहकार्याने शासकीय मातीची चोरी करणारी टोळी ताब्यात घेत गाळमातीने भरलेली वाहने व मोकळी वाहने असा एकूण 1,00,10000 रक्कमेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुसेगाव चे सहायक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांनी दिली.
पुसेगाव : नागनाथवाडी गावचे हद्दीत व नेर तलावाच्या उत्तरेकडील मोकळे जमिनीतुन अज्ञात इसम पोकलॅण्ड चे साहाय्याने डंपर मध्ये बेकायदा बिगरपरवाना शासनाची माती भरून रात्रीच्या वेळी वाहतुक करून चोरून घेवून जात आहेत अशी माहिती मिळताच कोरेगाव डीवायएसपी व पुसेगाव पोलिसांच्या सहकार्याने शासकीय मातीची चोरी करणारी टोळी ताब्यात घेत गाळमातीने भरलेली वाहने व मोकळी वाहने असा एकूण 1,00,10000 रक्कमेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुसेगाव चे सहायक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांनी दिली.
कोरेगाव पोलीस ठाणे प्रतिनियुक्ती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कोरेगाव चे पोलीस कर्मचारी साहिल मुसा झारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी पोलीस अधिक्षक सातारा यांचे आदेशाने दिनांक 15/06/2022 रोजी रात्री 23.00ते दिनांक 16/06/2022 रोजीचे 04.00चे मुदतीत ऑलआउट नाकाबंदी नेमली होती. त्याप्रमाणे पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत ऑलआउट नाकाबंदी करीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना बातमी मिळाली की, नागनाथवाडी गावचे हद्दीत व नेर तलावाचे उत्तरेकडील मोकळे जमिनीतुन अज्ञात इसम पोकलॅण्ड चे साहाय्याने डंपर मध्ये बेकायदा बिगरपरवाना शासनाची माती भरून रात्रीच्या वेळी शासनाचे परवानगी शिवाय वाहतुक करून चोरून घेवून जात आहे. किंद्रे यांनी तात्काळ पुसेगाव चे सपोनि संदीप शितोळे यांना सूचना करत त्या ठिकाणी छापा करावयाचा आदेश दिला. दोन पंचांना बोलावून घेवून नेर तलावाचे उत्तर भागात जावून रात्री 03.00 वा. चे सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी 5 भरलेले डंपर तसेच 5 रिकामे डंपर माती भरणेसाठी उभे असलेले मिळून आले. तसेच डंपर मध्ये माती भरणेसाठी 2 पोकलँड मशिन मिळून आले. त्याचे वर्णनखालील प्रमाणे 1) सागर पोपट जाधव वय 32 वर्षे, रा. सासवड ता. फलटण जि. सातारा. याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन - अ) 10.02000/- एक पांढरे निळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 11 CH 3481 त्यात 5 ब्रास माती प्रत्येक ब्रास मातीची किंमत 400/- मिळून डंपरसह जुवाकिअं. 2) इसम नामे उमेश सुरेश खरात वय 22 वर्षे, रा. आंबळे ता. पाटण जि. सातारा. याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन अ) 10,00000/ एक पांढरे निळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 11 CH 1935 रिकामा जुवाकिअं. 3) इसम नामे पिंटूश्री गिरजलाल महतो वय 37 वर्षे, रा. झारखंड, याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन अ) 10,00000/- एक पांढरे निळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 46 BB 0060रिकामा जुवाकिअं. 4) इसम नामे पंकज जालिंदर मंडले वय 34 वर्षे, रा. वाठार निंबाळकर ता. फलटण जि. सातारा. याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन - अ) 10,00000/- एक पिवळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 09 BC 8277 रिकामा जुवाकिअं. 5) इसम नामे कचरु नामदेव वाघमारे वय 38 वर्षे, रा. जंजणे, सासवड मुळगाव धर्मापुरी ता. आंबेजोगाई जि. बीड. ता. फलटण जि. सातारा. याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन अ) 10,00000/- एक लाल हिरव्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 14 AS 7066 रिकामा जुवाकिअं. 6) इसम नामे पांडूरंग नारायण कड वय 36 वर्षे, रा. चाकण, ता. खेड जि. पुणे याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन अ) 10,00000/- एक पांढरा निळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 14JL 7911 रिकामा जुवाकिअं. 7) इसम नामे सुरेश महादेव खरात वय 50 वर्षे, रा. आंबळे ता. पाटण जि. सातारा. याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन अ) 10,02000/- एक पिवळ्या रंगाचा डंपर त्याचा - RTO नं. MH 11 AL 0113 त्यात 5 ब्रास माती प्रत्येक ब्रास मातीची किंमत 400/- मिळून डंपरसह जुवाकिअं. 8) इसम नामे योगेश विश्वास जाधव वय 28 वर्षे, रा. जंजणे, सासवड ता. फलटण जि. सातारा. याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन 10,02000/- एक पांढरा निळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 11 CH 7025 त्यात 5 ब्रास माती प्रत्येक ब्रास मातीची किंमत 400/- मिळून डंपरसह 9) इसम नामे कृष्णा भिकारी यादव वय 28 वर्षे, रा. बिहार याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन अ) 10.02000/- एक पिवळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 11 AL 5910 त्यात 5 ब्रास माती प्रत्येक ब्रास मातीची किंमत 400/- मिळून डंपरसह . 10) डंपर नं. MH 12 HD 7142 वरील पळून गेला चालकाने सोडून दिले मालाचे वर्णन अ) 10.02000/- एक पिवळ्या रंगाचा डंपर त्याचा RTO नं. MH 12 HD 7142 त्यात 5 ब्रास माती प्रत्येक ब्रास मातीची किंमत 400/- मिळून डंपरसह असा एकूण 1,00,10000 रक्कमेचा मुद्देमाल या छापा कारवाईत मिळून आला.
एकूण नऊ चालक यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले आहे. पहाटे 03.00 वा. चे सुमारास मौजे नागनाथवाडी गावचे हद्दीत व नेर तलावाचे उत्तरेकडील बाजूचे मोकळे जमिनीतील शासकिय मालकीची माती आरोपी 1) सागर पोपट जाधव, 2) उमेश सुरेश खरात, 3) पिंटूश्री गिरजलाल मेहता, 4) पंकज जालिंदर मंडले, 5) कचरु नामदेव वाघमारे, 6) पांडूरंग नारायण कड, 7) सुरेश महादेव खरात, 8) योगेश विश्वास जाधव, 9) कृष्णा भिकारी यादव 10) डंपर नं. MH 12 HD 7142 वरील पळून गेला चालक यांनी आपसात संगणमत करून शासकीय मातीची बेकायदा बिगर परवाना तिचे उत्खनन करुन दोन पोकलँड मार्फत सदरची माती वर नमूद डंपर मध्ये भरुन तिची रात्रीची वाहतूक करताना सापडले असून सर्व वाहने पुसेगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत.