maharashtra

कळंत्रेवाडीनजीक मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरला आग

चालकाचे प्रसंगावधान : सुमारे 5 लाखांचे नुकसान

A tanker transporting sludge caught fire near Kalantrewadi
कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने अचानक पेट घेतला. शनिवारी 15 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली.

कराड : कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने अचानक पेट घेतला. शनिवारी 15 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अहमदनगर येथून उकडी कारखान्यातून जवळपास 40 टन मळी भरून आलेला टँकर जयगडच्या (रत्नागिरी) दिशेने चालला होता. टँकर चालकाने  शनिवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी
पाटण- पंढरपूर राज्यमार्गावरील कळंत्रेवाडीनजीक टँकर थांबवला. दरम्यान, टँकरच्या केबिनने अचानकपणे पेट घेतल्याचे टँकर चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर टँकर चालकाने स्थानिकांच्या मदतीने कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवळपास तासाच्या परिश्रमानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
या दुर्घटनेत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पाटण-पंढरपूर राज्य मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ती स्थानिकांसह उंब्रज पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी सुरळीत केली.