maharashtra

अवैध दारू वाहतूक प्रकरणी तिघांवर गुन्हा

सुमारे 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत सुमारे 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सातारा : अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत सुमारे 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेगाव-खातगुण जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी अरबाज रसूल शेख वय 24, ओंकार दादा पाटील वय 20 दोघेही राहणार कोरेगाव, ता. कोरेगाव आणि किरण जाधव (पूर्ण नाव माहित नाही) रा. वडूज, ता. खटाव यांच्याकडून 842 सीलबंद दारूच्या बाटल्या आणि एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.