maharashtra

अवैध वृक्षतोड करून वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; वाई वनविभागाची कारवाई

A case of illegal logging and transportation
अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव बलभीम जगताप असे त्या इसमाचे नाव असून त्याच्याकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाई : अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव बलभीम जगताप असे त्या इसमाचे नाव असून त्याच्याकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ एप्रिल रोजी माहिती मिळाली, पिराचीवाडी, ता. वाई गावच्या हद्दीत भुइंज ते आसले मार्गावर एक इसम अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वाई वन विभागाच्या पथकाने तात्काळ गस्त घालायला सुरुवात केली असता एक आयशर टेम्पो क्रमांक एम. एच.५० - १४३६ मध्ये रायवळ प्रजातीचे लाकूड अवैधपणे तोडून त्याची वाहतूक करण्यात येत असताना दिसून आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.