maharashtra

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी म्हसवड पोलिसांची कारवाई

सुमारे 17 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

गुन्ह्यामध्ये एकूण 17 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये जेसीबी डंपर व वाळू याचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे.

सातारा : दिनांक 5 डिसेंबर रोजी वाकी, ता. माण गावच्या हद्दीत माणगंगा नदीच्या पात्रात काहीजण अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची चोरटी विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर म्हसवड पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता काहीजण वाळूची डंपर क्रमांक एमएच 11 एएल 4845 मधून साडेतीन ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले. तसेच त्या ठिकाणी चार ब्रास वाळूचा ढीग करून तो विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला दिसून आला. या गुन्ह्यामध्ये एकूण 17 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये जेसीबी डंपर व वाळू याचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली असून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर, कोकरे, दांडेकर, निकम, बडे, माळी, रंगवाड यांनी केली आहे.