maharashtra

गजवडी येथे अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारे अटकेत


Arrested for illegally transporting timber at Gajwadi
वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि क्रेनवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

सातारा : वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि क्रेनवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
वनविभागाने दिलेली माहितीनुसार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रगस्त घालत होते. यावेळी गजवडी गावच्या हद्दीत लाकडांची अवैधरित्या वाहतूक केली जात होती. या वाहतूकीतील वाहन ट्रक (क्र. एम. एच 10 सी. आर. 4891) पकडण्यात आला. तर लाकूड भरण्यासाठी वापरण्यात आलेली क्रेन वाहन (क्र. एम.एच. 11 सी. डब्ल्यु. 1140) देखील जप्त करण्यात आली.
या प्रकरणी विजय दत्तात्रय साठे (रा.कवठे महाकाळ, जि.सांगली), मयुर सतीश फणसे (रा.देगांव ता. जि. सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. अवैध वृक्षतोड करणे तसेच त्याची विनापरवाना वाहतूक करणे हे भारतीय वन अधिनियम, 1927 नुसार गुन्हा आहे.