maharashtra

महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने सातार्‍यातील वाहतुकीत तात्पुरते बदल


Temporary changes in transport in Satara in connection with Maharashtra State Saffron Wrestling Competition
दि. 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत सातारा शहरातील शाहू स्टेडीयम येथे महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा सन- 2021-2022 होणार असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धक व स्पर्धा पाहण्यासाठी येणारे नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जुना आर.टी.ओ. ऑफिस चौक ते भु-विकास बँक चौक व एस.टी.स्टँड इन गेट ते भु-विकास बँक चौक या मार्गावरील वाहतूकीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

सातारा : दि. 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत सातारा शहरातील शाहू स्टेडीयम येथे महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा सन- 2021-2022 होणार असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धक व स्पर्धा पाहण्यासाठी येणारे नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जुना आर.टी.ओ. ऑफिस चौक ते भु-विकास बँक चौक व एस.टी.स्टँड इन गेट ते भु-विकास बँक चौक या मार्गावरील वाहतूकीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये साताराचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटले आहे की, कायदा 1988 कलम 115, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा सन- 2021-2022 कालावधीत वाहतूक व्यवस्थेत दि. 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत खालीलप्रमाणे तात्पुरता बदल करीत आहे याची नोंद घ्यावी.

वाहतूकीकरिता बंदी घालण्यात आलेला मार्ग :-
दि. 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत स्पर्धा सुरू झालेपासून ते संपेपर्यंत खालील मार्गावर वाहतुकीकरीता बंदी करण्यात येत आहे.
1) जुना आर.टी.ओ.चौक ते भु-विकास बँक चौक व भु-विकास बँक चौकातून शाहू स्टेडीयम मार्ग- एस.टी.स्टँंड इन गेट कडे जाणार्‍या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना (ऍम्बुलन्स, अग्निशामक व पोलीस वाहने वगळता) येण्या-जाण्याकरीता बंद करण्यात येत आहे.

वाहतूकीकरिता पर्यायी मार्ग :- (ड्रायव्हर्शन)
1) वाढे फाटा चौकातून मोळाचा ओढाकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांसाठी जुना आर.टी.ओ.चौक - पारंगे चौक - एस.टी.स्टॅड इन गेट - भूविकास बँक चौक मार्ग मोळाचा ओढा या ठिकाणी जातील.
2) वाढे फाटा चौकातून मोळाचा ओढाकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांसाठी जुना आर.टी.ओ.चौक - पारंगे चौक - एस.टी.स्टँंड इन गेट - राधिका सिग्नल- राधिका रोड - बुधवार नाका मार्ग मोळाचा ओढा या ठिकाणी जातील.
3) वाढे फाटा चौकातून मोळाचा ओढाकडे जाणार्‍या व येणार्‍या वाहनांसाठी जुना आर.टी.ओ.चौक - पारंगे चौक- पोवई नाका-राजपथ रोड - मोती चौक - राधिका टॉकीज चौक - बुधवार नाका मार्ग - मोळाचा ओढा या ठिकाणी जातील.

वाहन पार्किंग व्यवस्था :-
1) महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेकरीता येणारे स्पर्धक व स्पर्धा पाहण्यासाठी येणारे यांनी आपली वाहने जिल्हा परिषद मैदान, सभापती निवास (पोवई नाका), तालीम संघ मैदान, शानबाग शाळेचे मैदान, करंजे येथील दिपक पाटील यांच्या मोकळ्या जागेत व मोळाचा ओढा येथील आय.टी.आय कॉलेज चे मैदान या ठिकाणी पार्किंग करावीत. या बदलाची सर्व नागरीकांनी नोंद घेवून सातारा जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.