घेतला कामकाजाचा आढावा; केले अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन
सातारा : सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आज राज्य परिवहन आयुक्तांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची उपस्थिती होती.
आज दुपारी राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी सातारा कार्यालयातील कामकाजाचा आढावा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्याकडून घेतला व त्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी अधिकारी-कर्मचार्यांना मार्गदशन केले. यावेळी त्यांनी अधिकारी-कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांना येणार्या अडचणी समजून घेतल्या आणि त्याबाबत निरसनही केले.