sports

सातारा जिल्हा बँकेकडून म्हसवड कोविड सेेंटरला पहिले व्हेंटिलेटर बायपॅप मशीन

...तर सुसज्ज आयसीयू सेंटर उभारण्यास मदत करणार ः अनिल देसाई

म्हसवड येथील कोवीड सेंटरला तीन लाख रुपये किंमतीचे  बँकेकडून पहिले व्हेटिलेटर बायपॅप मशिन देण्यात आले आहे. येथील डॉक्टरांनी सहकार्य केले तर येथे जिल्ह्यातील एक आदर्श आयसीयु सेंटर उभारण्यासाठी जिल्हा बँक व देसाई कुटुंबाच्या माध्यमातून देण्यास मी तयार आहे. - अनिलभाऊ देसाई, संचालक, सातारा जिल्हा बँक

म्हसवड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. बँकेने नफ्यामधून कोरोनाग्र्रस्तानां मदतीसाठी तीन कोटी रुपये देण्याचे ठरविले असून त्यातून म्हसवड येथील कोवीड सेंटरला तीन लाख रुपये किंमतीचे  बँकेकडून पहिले व्हेटिलेटर बायपॅप मशिन देण्यात आले आहे. येथील डॉक्टरांनी सहकार्य केले तर येथे जिल्ह्यातील एक आदर्श आयसीयु सेंटर उभारण्यासाठी जिल्हा बँक व देसाई कुटुंबाच्या माध्यमातून देण्यास मी तयार असल्याची ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई यांनी दिली.

विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून व जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साधारण तीन लाख रुपये किमतीचे जिल्ह्यातील पहिले ’बायपॅप मशीन म्हसवड DCHCसाठी तालुका  वैद्यकिय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांचेकडे सपूर्त करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

देसाई म्हणाले, आम्ही म्हसवडकरच्या माध्यमातून माझे कुटुंब माझा परिसर माझे शहर याची जबाबदारी माझी हि भूमिका घेऊन आपण काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद देऊ तेवढे थोडेच आहे. देसाई कुटुंबाच्यावतीने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये या सेंटरला पाच जम्बो ऑक्सीजन सिलेंडर देण्यात आले होते.  म्हसवड मधिल सर्व डॉक्टरानी सहकार्य करण्याचे ठरवले तर याठिकाणी सातारा जिल्ह्यातील एक आदर्श आय सी यु सेंटर उभे करण्यासाठी जी जी मदत लागेल ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  व देसाई कुटुंबाच्या माध्यमातून देण्यास  मी तयार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी अँम्बूलेन्सची अनेक दिवसाची मागणी होती  विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या निधितून 8 लाख रुपये देऊन पूर्ण केली असून लवकरच अँम्बूलंन्स  आपल्याला उपलब्ध होईल. तसेच तिसर्‍या येऊ घातलेल्या लाटेत लहान मुलासांठी आधुनिक सर्व सोईनी युक्त हॉस्पिटल सुरु करण्यासाठी तूम्ही  प्रयत्न करत आहात. त्याकरीता जी काही मदत  लागेल ती  देसाई कुटुंब  करण्यास  तयार असल्याचेही देसाई यांनी सांगीतले. तसेच   सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नियमित कर्ज फेडणार्‍या माण तालुक्यातील 25  हजार कर्जदार सभासद व त्यांच्याघरातील प्रत्येकी 1 असे एकूण 50 हजार   कर्जदार सभासदाना 1 ते दीड  लाखापर्यंतचा औषध उपचार (कॅशलेस) इंशुरंस मोफत देण्याचा बँकेने मानस केला असल्याचेही  शेवटी देसाईंनी सांगीतले.

यावेळी बोलताना युवराज सुर्यवंशी म्हणाले आम्ही म्हसवडकर यांच्या माध्यमातून सुरु केलेल्या या कोवीड सेंटर मुळे म्हसवड व परिसरातील सर्व सामान्य कुटुंबातील हजारो नागरीकांना फायदा झाला असून याठिकाणी ज्याचे एच आर सी स्कोर 19 च्या वर असणारे व ऑक्सिजन लेवल 55च्या खाली असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार होऊन आपल्या घरी परतले आहेत  अनेक जन उपचार घेत आहेत याठिकाणी सर्व सोई मोफत देण्यात येत असून याठिकाणचे सर्व डॉक्टर नर्स वॉर्डबॉय  व इतर कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता मनापासून काम करत आहेत.

याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कोडलकर,व्यवस्थापक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मा.जयवंत पवार,नोडल ऑफिसर डॉ.राजेंद्र मोडासे, विभागीय अधिकारी भाऊसाहेब शिंगाडे,आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सदस्य युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे,एल.के.सरतापे, राहुल मंगरुळे, प्रशांत दोशी, खंडेराव सावंत,संजय टाकणे,प्रितम तिवाटणे, डॉ.राजेश शहा, डॉ.गावडे, डॉ.शेळके मॅडम, डॉ.सावंत, डॉ. सिमरन मुल्ला मॅडम,गणेश माने,सुहास भिवरे, अविनाश मासाळ,धनाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते