maharashtra

अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सुमारे 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमारे 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सातारा : अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एकावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमारे 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 फेब्रुवारी रोजी 5 वाजण्याच्या सुमारास पळशी, ता. माण गावच्या हद्दीत धामणी-पळशी रस्त्यावर सागर जिजाबा खाडे वय 20, रा. पळशी, ता. मान हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये चोरटी वाळू घेऊन जाताना आढळून आला.
याप्रकरणी खाडे याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सुमारे 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डी. पी. खाडे करीत आहेत.