maharashtra
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि पै फ्रेंडस लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख पुस्तकाचे मोफत वाटप.
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि पै फ्रेंडस लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख पुस्तकाचे मोफत वाटप.
दि.23/4/23 रोजी जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 5 ते 10 या वेळेत फडके रोड या ठिकाणी रोडवर एक लाख पुस्तकांची मांडणी करून वाचकांना त्यांच्या आवडीचे एक पुस्तक मोफत देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून करण्यात आले होते. सकाळी ठीक ५ वाजता सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री. सुनील कुराडे साहेब, उमेश गीते साहेब वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, भाई पानवडीकर शिवसेना ग्राहक डोंबिवली शहर प्रमुख, विशाल शेटे शिवसेना ग्राहक उपशहर प्रमुख, व नितीन पवार साहेब उपस्थित होते .