पिंपरे बु॥ ता खंडाळा येथील कापसेवस्ती येथे बांधकाम उद्योजक विलास यादव यांच्या फार्म हाऊसवर ग्रामस्थाच्या वतीने लोकसहभागातुन कोरोनाबाधित रुग्णासाठी सुसज्ज असे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पिपंरे बु॥ गावचे युवा नेते संभाजी घाडगे यांनी दिली.
लोणंद : पिंपरे बु॥ ता खंडाळा येथील कापसेवस्ती येथे बांधकाम उद्योजक विलास यादव यांच्या फार्म हाऊसवर ग्रामस्थाच्या वतीने लोकसहभागातुन कोरोनाबाधित रुग्णासाठी सुसज्ज असे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पिपंरे बु॥ गावचे युवा नेते संभाजी घाडगे यांनी दिली.
या विलगीकरण कक्षाचा शुभारंभ पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, डॉ संजीवन पवार, आशा सेविका सारिका सोनवणे, आरोग्य सेवक बिचुकले,अनुपमा मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी संभाजी घाडगे यांनी कोवीड विलगीकरण कक्षासाठी २१ हजार रुपयाची मदत दिली. तसेच संभाजी घाडगे यांनी आशा सेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रत्येकी १ हजार रूपयाचा धनादेश प्रोत्साहन पर स्वनिधीतुन दिला. तसेच भैरवनाथ देवस्थान यात्रा कमिटीने ३० हजार रुपयाची मदत विलगीकरण कक्षासाठी केली, या विलगीकरण कक्षामध्ये २० बेड,पौष्टीक जेवण, नाष्टा आदी सोयी करण्यात आल्या आहेत.
यावेळी ग्रा. प. सदस्या सुनिता कापसे, कोमल कोळपे, ग्रामसेवक डी .जे. सोनवणे, तलाठी बाबर, माजी सोसायटी चेअरमन अंकुश ननावरे, ज्ञानदेव कापसे, विठ्ठल ननावरे, संजय कापसे, रविंद्र पांडोळे, धनाजी डोईफोडे, बाळासो धायगुडे, तुषार वाघ, विठ्ठल सांळुखे, पोपट यादव, अविनाश कापसे, रोहिदास कापसे, सयाजी शिंदे, जगन्नाथ कापसे, बजाजी चव्हाण, संदीप यादव, ऋषी शिंदे, सौरभ चव्हाण, नरेंद्र निगडे, सुरेश कापसे, पांडुरंग यादव, पप्पू निगडे, रोहित पवार, आदी उपस्थित होते, हे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात गावातील युवकांनी मोलाची मदत केली आहे.