maharashtra

पाल येथील यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल


Changes in transportation due to Yatra at Pal
पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा दि. 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत संपन्न होणार असून कोरोना आणि ओमायक्रान च्या अनुषंगाने ही यात्रा प्रशासनाच्या नियमावलीनुसार साजरी करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त पोलीस अधिक्षक अजय बंसल यांच्या सूचनेवरून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

सातारा : पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा दि. 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत संपन्न होणार असून कोरोना आणि ओमायक्रान च्या अनुषंगाने ही यात्रा प्रशासनाच्या नियमावलीनुसार साजरी करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त पोलीस अधिक्षक अजय बंसल यांच्या सूचनेवरून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
काशिळकडुन तारळेकडे जाणारी सर्व वाहने निसराळे फाटा, इमर्सन कंपनी सासपडे मार्गे तारळेकडे जातील. तारळेकडुन काशीळ अथवा कराडकडे जाणारी वाहतुक ही तारळे येथून कोंजावडे फाटा - सासपडे मार्ग- खोदड फाटावरून कराडकडे जातील. कराड तसेच पाल भागातुन तारळे भागात जाण्याकरिता खोदड, ता. सातारा येथील फाट्यावरुन इमर्सन कंपनी शेजारून सासपडे मार्गे तारळेकडे जातील. दि. 14 ते दि. 19 जानेवारीपर्यंत पाल गावात येणार्‍या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
मिरवणुकीला परवानगी
यात्रेच्या निमित्ताने मिरवणुकीला परवानगी देण्यात आली असुन  मिरवणुक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढायचे किंवा काढु नये. मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावाप्रसंगी कोणत्या रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागेत गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असेल तर अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.