सातारा-लातूर महामार्ग असल्याने या मार्गावर अगोदरच मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. त्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्या पासून या मार्गावर ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. सकाळ व सायंकाळी या रस्त्याने सर्व शासकीय, खासगी व बँक आदी कार्यालयाचे अधिकारी वर्ग, शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॅालीत क्षमतेपेक्षा किती तरी पटीने जास्त ऊस भरलेला असतो.
पुसेगाव : सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्टर- ट्रॅालीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतूकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून ही वाहतूक होत असल्याने कोरेगाव-खटाव या मार्गावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबधित विभाग याकडे लक्ष का घालत नाही, असा वाहन चालक व प्रवाशांमधून प्रश्न विचारला जात आहे.
सातारा-लातूर महामार्ग असल्याने या मार्गावर अगोदरच मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. त्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्या पासून या मार्गावर ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. सकाळ व सायंकाळी या रस्त्याने सर्व शासकीय, खासगी व बँक आदी कार्यालयाचे अधिकारी वर्ग, शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॅालीत क्षमतेपेक्षा किती तरी पटीने जास्त ऊस भरलेला असतो. या मार्गावर चढाच्या ठिकाणी या वाहनांची पुढची चाके एवढ्या वर उचलली जातात की, ट्रॅक्टर चालकांची कसरत पाहून बाजूने जाणाऱ्या वाहनचालकांच्या उरात धडकी भरते.
त्याचबरोबर ट्रॅाली मागे जाऊ नये म्हणून चाकांना लावलेले दगड बर्याचदा रस्त्यावरच असतात. याचा नाहक त्रास इतर वाहन चालकांना होत असतो. गेल्या दोन वर्षात अनेकांना या महामार्गावर आपले प्राण गमवावे लागले, तर काही दुचाकी व पादचारी जायबंदी झाले असून काहींना कायमचे अपंगत्व आले. संबधित विभागाने वाहतूकीला शिस्त लावून अवैध प्रकारची जीवघेणी ऊस वाहतूकीला आळा घालावा अशी अपेक्षा वाहन चालकांमधून व्यक्त होत आहे.