मनसेच्या मागणीने पवनचक्की कंपन्यांना जाग; पाटण तालुक्यात आले पहिले व्हेंटीलेटर युनिट
मनसेच्या आक्रमक पवित्र्याचा कंपन्यांनी घेतला धसका
By पाटण | विद्या म्हासुर्णेकर Thu 20th May 2021 03:10 pm
दोनचं दिवसापूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर व त्यांचे सहकारी पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर व मनसैनिक यांनी पवनचक्की कंपन्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात अॉक्सिजन विथ व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था या पवनचक्की कंपन्यांनी करावी अशी मागणी केली होती. पाटण कोविड केअर सेंटरला रत्नागिरी विंड पॉवर प्रोजेक्ट प्रायवेट लि. ग्रिनको च्या वतीने तालुक्यात पहिले व्हेंटिलेटर युनिट प्रांताधिकारी तथा इंसिडेंट कमांडर श्रीरंग तांबे व तहसिलदार योगेश्र्वर टोंपे यांच्याकडे सुपुर्द केले. मनसेच्या मागणीने एका कंपनीला जाग आली परंतू, अजून इतर ही कंपन्यांनी लवकरात लवकर जागं व्हावं.. मनसेचा लढा थांबलेला नाही आणि थांबणार नाही. पवनचक्की कंपन्यांनी लवकरात लवकर कोविंड सेंटर उभारावं यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत.