sports

सह्याद्रि हॉस्पिटल पुन्हा एकदा कोविड लसीकरणासाठी सज्ज

सातारा जिल्ह्यातील पहिले खाजगी रुग्णालय "सह्याद्री हॉस्पिटल " लसीकरणासाठी सज्ज !

"सध्या सातारा जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा असताना जनतेच्या सुरक्षिततेसाठी सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने त्वरित लस खरेदी करून लोकांसाठी लसीकरणाची सोय केली आहे. केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटलना लस खरेदीची परवानगी दिल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव खासगी रुग्णालय आहे ज्यांनी लस उपलब्ध केली आहे. " - विश्वजित डुबल, मार्केटिंग मॅनेजर

कोविड विरूद्ध लढ्यात सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी सह्याद्रि हॉस्पिटल कराड पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.सोमवार,दि.२४ मे २०२१ पासून वय वर्षे ४५ आणि त्यापुढील लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होता येणार आहे. पुणे येथील खाजगी रुग्णालयाप्रमाणेच सह्याद्री हॉस्पिटल कराड मध्ये देखील रु.९०० शुल्क भरून नागरिकांना लस घेता येईल. यासाठी कोविन ऍपवर पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल मधून टोकन घेऊन पूर्वनियोजित वेळेमध्ये लसीकरण पार पडेल. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेता येईल. याबाबत अधिक माहिती देताना सह्याद्रि हॉस्पिटल कराडचे व्यवस्थापक डॉ. वेंकटेश मुळे म्हणाले की, "कोविड विरुद्धच्या लढ्यात सर्वांत महत्त्वाचा भाग असलेली लसीकरण मोहिम ही आता आपल्या इथे सुरू होत आहे.या सर्वांत आव्हानात्मक काळात लसीकरण मोहिम सुरू होणे ही कराड येथील आपल्या सर्व नागरिकांसाठी एक सुखद बातमी आहे. ही लसीकरण मोहिम रोज सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहील.सध्या आपल्या येथे कोविशिल्डचे डोसेस प्राप्त झाले आहेत.तरी सर्वांनी कोविन पोर्टल ( संकेतस्थळावर) पूर्वनोंदणी करून या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे आणि स्वत:ला व कुटुंबियांना सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकावे असे आम्ही आवाहन करतो." ते पुढे म्हणाले की," गेले वर्षभर प्रशासन,रूग्णालय आणि समाजातील सर्वच घटक या महामारीचा धैर्याने आणि जिद्दीने सामना करत आहे.अनेकांना या महामारीमुळे दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला.अनेकांनी आपले कुटुंबीय व स्नेही गमावले.अशा सर्व कठिण काळात लसीकरण सुरू होणे ही एक दिलासादायक बाब आहे."