sports

मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पुन्हा स्व खर्चाने केले जीवनावश्यक वस्तूचे वाटप

गतवर्षी खटाव माण तालुक्यात ६ हजार हुन अधिक लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील ६ हजाराहून अधिक लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा त्यांनी गोंदवले येथे स्व खर्चाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव तसेच लॉकडाऊन मुळे। सर्वच ठिकाणचे व्यवसाय धंदे बंद असल्याने सर्व सामान्य लोकाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यांना आधार मिळावा यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पुढाकार घेऊन लोकांना किराणा माला सारख्या जीवनावश्यक वस्तूचे वाटप सुरू केले आहे. आज त्यांनी गोंदवले येथील इंदिरा नगर याठिकाणी स्वतः जाऊन कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले. त्यावेळी माजी सरपंच गुलाबराव कट्टे , महादेव राऊत, विलास पवार, संदीप फडतरे, धनाजी पडमलकर , सामाजिक कार्यकर्ते नेताजी कट्टे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले राजकीय लोकांनी सुद्धा बाहेर पडून गोर गरजू लोकांच्या मदतीला यावे. सध्याचा काळ कठीण आहे. लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत गरजू लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे ही ते म्हणाले.