नियम मोडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे स्पष्ट आदेश
अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ऊस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
सातारा : अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ऊस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
सातारा जिल्हयामध्ये साखर कारखाने सुरु झालेले असुन कारखान्यांना कच्चा माल म्हणुन ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढलेली आहे. काही ऊस वाहतुक वाहनचालक ऊसाची वाहतुक करताना वाहनांच्या दोन्ही बाजुस व पाठीमागील बाजुस रिफ्लेक्टर लावत नाहीत. तसेच वाहनांवर कर्कश्य आवाजामध्ये गाणी लावलेली असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले जाते.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या हलगर्जीपणामुळे अपघात होवु नयेत म्हणुन ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, रिफ्लेक्टर न लावलेस कारवाई करणे, ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांवरील कर्कश साउंडवर ध्वनीप्रदुषण कायद्यान्वये कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत असुन मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत सातारा जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आज दिनांक ११ रोजी सातारा जिल्हयात विशेष मोहिम राबवुन ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रेडीयम रिफ्लेक्टर न लावल्याबद्दल एकुण २०५ वाहनांवर कारवाई करुन एकुण १,९०,६००/- रुपये एवढा दंड वसुल करुन या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्यात आलेले आहेत. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या एकुण १८ वाहनांवर कारवाई करुन एकुण १२,०००/- रुपये एवढा दंड वसुल केला आहे. तसेच एकुण ७८ वाहनांवरील साऊंड काढण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच इतर कायद्यान्वये एकुण १०८ वाहनांवर कारवाई करुन एकुण ७५,५००/- रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.
यापुढे देखील सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, रिफ्लेक्टर न लावलेस कारवाई करणे, ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांवरील कर्कश साउंडवर ध्वनीप्रदुषण कायद्यान्वये कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम सुरू राहणार आहे.