maharashtra

सुमो गाडीतून स्फोटक कांड्या वाहतूक करणार्‍या दोघांवर गुन्हा

सातारा दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; 1600 जिलेटीनच्या कांड्या जप्त

Crime against two persons transporting explosives in a sumo car
चारचाकी वाहनातून स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा अँटी टेररिस्ट सेलच्या (एटीसी) पथकाला मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणे येथे एक सुमो संशयास्पदरीत्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थांबवली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्यांचा साठा होता.

सातारा : शेंदुरजणे ता.कोरेगाव येथे सातारा दहशतवाद विरोधी पथकाने (एटीसी) सुमो वाहनातून स्फोटके वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 1600 जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही कारवाई दि. 9 रोजी करण्यात आली आहे. चारचाकी वाहनातून स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा अँटी टेररिस्ट सेलच्या (एटीसी) पथकाला मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणे येथे एक सुमो संशयास्पदरीत्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थांबवली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्यांचा साठा होता. चालकाकडे याबाबत चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे परवाना, खरेदी व विक्रीची पावत्या, वाहनाची कागदपत्रे काहीच नव्हते. अधिक माहिती घेतली असता या जिलेटीनच्या कांड्या शेरखान अल्लाबेली मन्सुरी (रा.सातारा) याने वाहतुक करण्यास सांगितल्याची कबुली दिली.
एटीसी पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यामध्ये 1600 जिलेटीनच्या कांड्या होत्या. पोलिसांनी सुमोसह स्फोटके जप्त केली. मध्यरात्री याप्रकणी कोरेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.