maharashtra

भेसळयुक्त डांबर व ऑईलची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर कारवाई

३४ बॅरलसह ३५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Action taken against truck driver transporting adulterated tar and oil
फलटण, ता. फलटण येथील बारामती पुलानजीक भेसळयुक्त डांबर व ऑईलची  वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यातील पथकाने धडक कारवाई करून ३४ बॅरलसह ३५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सातारा :  फलटण, ता. फलटण येथील बारामती पुलानजीक भेसळयुक्त डांबर व ऑईलची  वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यातील पथकाने धडक कारवाई करून ३४ बॅरलसह ३५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ मे रोजी ५.४५ वाजण्याच्या सुमारास लोणंद बाजूकडून ट्रक क्रमांक एम. एच. २५ यु ८२९२ मधून भेसळयुक्त डांबर व ऑईलची वाहतूक होत असल्याची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी फलटण येथील बारामती पुलाजवळ नाकाबंदी केली असता संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यावरील चालक लहू बब्रुवान माने, रा. चंडकाळ, ता. उमरगा याने प्रथम आतील मुद्देमाल हा सचिन कुऱ्हाडे व इतर दोन अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून शिरवळ येथील राजस्थानी ढाब्याच्या पाठीमागे भरला असून तो हैदराबाद येथे घेऊन जात असल्याची माहिती त्याने दिली. डांबर आणि ऑइलच्या बॅरलवरील नोंदीची पाहणी केली असता
संबंधित मुद्देमाल दिल्ली येथून भरून हैदराबाद येथे खाली करण्यास निघाला असल्याचे नमूद केल्याने संशय अधिक मिळवला. याबाबत ट्रक चालकाकडे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरू केल्याने ट्रक फलटण पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावला.
ट्रक चालकाला न्यायालयासमोर उभे उभे करून न्यायालयाकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी परवानगी घेतली. त्यानंतर फलटण तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांच्यासमक्ष क्रेनच्या सहाय्याने ट्रक मधील बॅरेल खाली उतरून ते तपासले असता एकूण ५२ बॅरल हे भेसळयुक्त डांबराचे तर ३४ बॅरेल भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. ट्रकसह एकुण ३५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत ट्रक चालकासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक भारत किद्रे, सांगली पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे, पोलीस हवालदार सुरेश शिंदे, महादेव पिसे आदींनी सहभाग घेतला.