sports

महिलेसह बालकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

वारूंजी येथील घटना; घटनास्थळी पोलीस दाखल

कराड ः वारूंजी ता. कराड येथे घरामध्ये महिलेसह दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिला व बालक भाडेतत्वावर वारूंजी येथे रहात आहेत. संबंधित महिलेचे नाव सुशिला शिंदे व मुलाचे नाव विराज गायकवाड असल्यचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. याबाबतची सखोल माहिती व मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...