कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना
By वाठार प्रतिनिधी | सुरेश माने Tue 25th May 2021 11:47 am
मालखेड ता.कराड येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत माहिती ग्रामस्थांना दिली. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गावातील गर्दीची ठिकाणी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.तसेच गटारांची स्वच्छता करण्यात आली.कोरोना आजारांवर उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे , तसेच प्रत्येकांने या आजाराबाबत दक्षता घेतली पाहिजे तरच कोरोना बाधितांची रूग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तलाठी देशमुख , ग्रामसेविका पुजारी यांनी यावेळी केले . यावेळी तलाठी देशमुख , ग्रामसेविका पुजारी , पोलिस पाटील स्वाती शिवदास ,सरपंच इंद्रजित ठोंबरे , उपसरपंच युवराज पवार , आनंदराव माने, देवदास माने , सदाशिव भोसले, वसंत शिवदास , जगन्नाथ मस्के ,हणमंत शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य तानाजी माने , अंजना बुरंगे , दत्तात्रय निकणके , पत्रकार सुरेश माने,संदीप मोहिते, बाजीराव माने, पोपट ठोंबरे, चंद्रकांत बुरंगे , ओंकार पाटील , विलास मोरे , आशा सेविका छाया भिंगारदेवे , ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत निकणके ,दत्तात्रय कोळी , कुमार साठे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.