maharashtra

बोरगाव पोलिसांकडून विनापरवाना गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई

एक लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

बोरगाव पोलिसांनी नागठाणे गावामध्ये पेट्रोलिंग च्या दरम्यान शनिवारी पहाटे पाच वाजता वेळापुरे दुकानासमोर एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर पद्धतीने आणण्यात आलेला गुटखा व मारुती कंपनीचे चार चाकी वाहन असे एक लाख 63 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सातारा : बोरगाव पोलिसांनी नागठाणे गावामध्ये पेट्रोलिंग च्या दरम्यान शनिवारी पहाटे पाच वाजता वेळापुरे दुकानासमोर एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर पद्धतीने आणण्यात आलेला गुटखा व मारुती कंपनीचे चार चाकी वाहन असे एक लाख 63 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बोरगाव पोलीस स्टेशनचे चेतन मछले यांना गोपनीय सूत्रांकडून विनापरवाना गुटखा नागठाणे येथे आणला जाणार आहे अशी बातमी मिळाली होती. राजू शिखरे, किरण निकम, प्रशांत मोरे आणि इत्यादी सहकाऱ्यांनी नागठाणे गावांमध्ये पेट्रोलिंगच्या दरम्यान वेळापूर दुकानासमोर एका चार चाकी वाहनाला अडवून त्या वाहनाची तपासणी केली. सुधीर बाबासो साळुंखे वय 30 राहणार नागठाणे असे गाडी चालकाने स्वतःचे नाव सांगितले. त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता 28 हजार 314 रुपयांचा केशरयुक्त विमल पान मसाला 3143 रुपयांचा केशरी रंगाचे एक तंबाखूचे 143 पुढे 15521 रुपयांची केसरी युक्त विमल पान मसाला चे 83 पुढे 2739 रुपयाची जांभळे लाल रंगाचे तंबाखूचे 83 पुढे 12360 रुपयांची विमान पान मसाला निळ्या रंगाचे 103 पुढे 390 रुपयांचे तंबाखूचे 103 पुढे आणि मारुती कंपनीची चार चाकी गाडी असा एक लाख 63 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत राजू शिखरे, दादास्वामी, प्रशांत मोरे, विशाल जाधव, किरण निकम यांनी सहभाग घेतला.