Maharashtra Weather News : हवामानासंदर्भातील आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी.... थंडीचा कडाका वाढत गेला आणि अचानकच राज्याच पाऊस आला. पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा...
पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज (8 सप्टेंबर) आणि उद्या (9 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
कॅफेत अश्लील चाळेप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा
एप्रिल महिन्याअखेरीस पावसाचा अंदाज
सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाई, खंडाळा, भुईंज तसेच सातारा तालुक्यातील लिंब, नागठाणे, खिंडवाडी येथे महामार्ग परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र चांगलीच पळापळ झाली.
मुलांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याविषयी... आपल्या मुलांची सर्वांगिण वाढ व्हावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. वाढीचा विचार करत असताना मुलांची वाढ जितकी महत्त्वाची असते, तितकीच त्यांची बौद्धिक आणि भावनिक, मानसिक वाढही होणे गरजेचे असते. मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा यासाठी आपण त्यांना वेगवेगळे ब्रेन गेम्स आणतो. त्यांना काही ना काही बौद्धिक अॅक्टीव्हीटीज देतो. पण मेंदूचा चांगला विकास व्हावा यासाठी या इतर गोष्टींबरोबरच मुलांचा आहारही उत्तम असणे आवश्यक असते. मुलांच्या मेंदूला ७ पोषक घटकांची प्रामुख्याने आवश्यकता असते. ते कोणते आणि त्याचा कशाप्रकारे फायदा होतो याबाबत समजून घेऊया (3 foods to boost your child’s brain development )...
यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी आणि साताऱ्याचे पर्यटन, रोजगार वाढवावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली,
पाटण, ता. पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार अज्ञात इसमांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुघी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
७ नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दिवस भारताच्या दृष्टिने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न मुलांच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे.
शिरवळ येथून सुमारे दोन लाखांच्या धान्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पावसामुळे सातारा जिल्ह्यातील फलटणमधील सोमंथळी येथे मोठी घटना घडली आहे. या घटनेत सोमंथळी पावसामुळे ओढ्याला अचानक पूर आला आणि या पुरात कार बुडाली. ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. मात्र या घटनेत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे.
जालना येथील वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील विकास गणेश मस्के याला सातारा येथे अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सातारा शहरांमध्ये रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी येथीलच दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे
सायंकाळी मुसळधार पावसाने सातारा शहर परिसराला झोडपून काढल्यामुळे तब्बल तासभर जनजीवन ठप्प झाले होते. धो धो पाऊस पडल्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. दुसरीकडे रस्त्यावर बसलेल्या साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे फार मोठे नुकसान झाले.
कोयना धरण पाणलोट क्षेत्राात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी सकाळपासूनही मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात धरणात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणात 68.89 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
सातारा शहराला सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होत संपूर्ण परिसर अंधारून गेला. ढगांनी दाटी केल्यानंतर चार वाजल्यापासून या पावसाला जोरदार सुरुवात झाली.
सातारा शहरातील तालीम संघ परिसरात घरात हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून की आत्महत्या याबाबत पोलीस साशंक असून, शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण समजू शकणार आहे.
दांडेघर, ता. महाबळेश्वर येथील डोंगराला अतिवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे डोंगराशेजारी असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत.
धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा फेसाळून कोसळू लागला आहे. सकाळी सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने थोडी उघडीप दिली तरी पश्चिम भागात मात्र दिवसभर पावसाने जोर पकडला होता.
महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील समीर बाबूराव उबाळे या मागासवर्गीय कुटूंबाचे घर पडून हे कुटूंब पूर्णतः बेघर होऊन रस्त्यावर आले.
सातारा वनविभागाच्या वतीने कासची नाईट सफारी सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून कास धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे ही नाईट सफारी सध्या तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे.
आरंभ प्रशिक्षण केंद्राचा वडूज अंगणवाडी सेविका मार्फत भव्य दिव्य शुभारंभ करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या मानसिक बदल, त्यांची आवडनिवड व इतर गोष्टींच्या बाबत योग्य पद्धतीने अंगणवाडी सेविका यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरु होवून नऊ दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप बुध परिसरात दमदार पाऊस पडला नाही. पावसाअभावी पेरणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
सैनिक फेडरेशनने येणाऱ्या पावसाळ्यात राज्यव्यापी वृक्षारोपण आणि संगोपनाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात १० हजार वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली.
तुमच्या मेंदूला योग्य आणि चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी आम्ही आज काही पर्याय सांगणार आहोत.
रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून 43 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता देऊर कोरेगाव च्या हद्दीत बिचुकले पुलावर घडली.
छ शाहू स्टेडियममध्ये ५ एप्रिल पासून रंगणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. संकुलामध्ये दोन मातीचे व तीन मॅटचे आखाडे वनविण्यात आले असून राज्यभरातील नऊशे मल्ल या आखाडयात मानाच्या गदेसाठी झुंजणार आहेत. कुस्तीपट्टू व प्रशिक्षक अशा एकूण अकराशे जणांसाठी क्रीडा संकुलामध्ये निवास व क्रीडा सुविधा उभारल्या जात आहेत.
दि. 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत सातारा शहरातील शाहू स्टेडीयम येथे महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा सन- 2021-2022 होणार असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धक व स्पर्धा पाहण्यासाठी येणारे नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जुना आर.टी.ओ. ऑफिस चौक ते भु-विकास बँक चौक व एस.टी.स्टँड इन गेट ते भु-विकास बँक चौक या मार्गावरील वाहतूकीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
रोज उठायचं, आवरायचं, घरातली कामं करायची आणि घाईघाईत ऑफीसला पोहोचायचं...दिवसभर ऑफीसचं काम करुन पुन्हा धावत घरी यायचं आणि घरातली कामं...यामुळे तुमचे शरीर मेंदू पार थकून गेला असेल तर एक सोपा उपाय...
दरुज, ता. खटाव येथील द्रोणाचार्य ॲकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षकाने शिवीगाळ व मारहाण केली असल्याची फिर्याद पिडीत महिला प्रशिक्षणार्थीने पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
हाल में आईएफएस अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) ने रेनबो यूकेलिप्टस (Rainbow Eucalyptus) की तस्वीरें शेयर कीं.
युक्रेन देशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 22 विद्यार्थी हे या देशामध्ये निवासी होते. युध्द काळापूर्वी 3 विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले होते. परंतू, 19 विद्यार्थी युध्द काळात युक्रेनमध्ये अडकले होते.
युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातुन वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी आज त्यांच्या घरी सुखरूप परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले असून उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना आडमुठे पणा आणि परावलंबी धोरणाचे परिणाम आताचे घडीला संपूर्ण युक्रेन ला भोगायला लागत आहे. चर्चेतून सुटू शकणाऱ्या बाबीसाठी आज महायुद्ध सुरु झाले आहे. भारत स्वतंत्र काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना हल्ले करत होते परंतु पाश्चिमात्य देश जपान हल्ले करत आहे अश्या बातम्या पेरत होते तसेच सद्यस्थितीला मीडिया तसेच सर्वत्र युक्रेनच्या पराक्रमाच्या बातम्या येत असल्या तरी वास्तवामध्ये रशियाने आतापर्यंत केलेले हल्ले आणि त्यातून युक्रेनचे झालेले नुकसान भरून यायला युक्रेनला कमीतकमी २० वर्षाचा कालावधी लागेल असे तज्ञांचे मत असून हे युद्ध असेच सुरु राहिले तर युक्रेन सारखा देश स्वतःचे नामोनिशाण गमवालेशिवाय राहणार नाही.
शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी देश प्रथम आहे, तरी भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे केंद्राची जबाबदारी आहे. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख व कराडचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक (वय 62) यांचे सोमवारी २२ रोजी रात्री उशिरा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कराड शहरासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत रेल्वे मालगाडीच्या समोर अचानक काही म्हैशी आल्यामुळे चालकाने रेल्वे मालगाडीला अचानक ब्रेक लावला. मात्र या अपघातात एका म्हैशीचा मृत्यू झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळत अन्य म्हैशी किरकोळ जखमी झाल्या.
दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ गायिका यांना या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्याने त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 28 जानेवारीच्या सुमारास तिला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले, जेव्हा तिच्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली. मात्र, ५ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडली आणि त्या पुन्हा व्हेंटिलेटरवर होत्या.
सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या भिंतीशिल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या परवानगी शिवाय केल्याप्रकरणी पुण्याचे मिलिंद एकबोटे आणि सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह पंचवीस ते तीसजणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने व थंडीने खटाव व वाई परिसरातील सुमारे 35 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार झाल्या आहेत. तसेच 10 अत्यवस्थ असून या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
ढगाळ वातावरण, बोचरी हवा आणि पावसाच्या रिपरिप सरी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सातारकर घेत आहेत. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाने सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपले. अचानक आलेल्या पावसाने सातारकरांच्या कामाचा खोळंबा तर झालाच, शिवाय प्रकृतीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.
१९७१ बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहिद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभर शौर्याजंली यात्रा सुरू करण्यात आली आहे. या शौर्ययात्रेचे कराड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात जंगी स्वागत करण्यात आले.
कोरोनाचा नवा ओमिक्रॉन स्ट्रेन आढळल्यानंतर दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांच्या काटेकोर तपासणीचे निर्देश केंद्र सरकारने दिले असतानाच महाराष्ट्र सरकारनेही आज मोठे पाऊल उचलत कोविड नियम अधिक कडक केले आहेत. राज्य सरकारने आज प्रवास व अन्य बाबींसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
कडप्पा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. तर अनंतपुरमध्ये ७ आणि चित्तूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला. सध्या काही भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
जिल्ह्याच्या विविध भागाला आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहिले. उंब्रजजवळील चोरे येथे घरात पाणी शिरले तर मांडवे येथे ओढ्याला आलेल्या पुरात महिला वाहून गेली.
कवठे, ता. खंडाळा येथे झोपडीवर वीज कोसळून जेवायला बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शशिकांत दादासाहेब लिमन (वय 35, रा. झगलवाडी, ता. खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय 60, रा. कवठे, ता. खंडाळा) अशी त्यांची नावे आहेत.
माण तालुक्यातील नरवणेसह दोरगेवाडी, काळेवाडी तसेच गटेवाडी परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली बाजरी, कांदा व मका आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
माण तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली असून, तालुक्याच्या पूर्व भागात या पावसामुळे नदी व ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच या पावसाने नदीकाठच्या परिसरामध्ये बाजरी व ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
पुसेगावसह परिसरात दररोज विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत असून, आठवडाभरात येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. सतत पडणार्या या मुसळधार पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
खटाव तालुक्याची जीवनवाहिनी येरळा (वेदावती) नदीवरील ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला रानवेली व झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे भिंतीला धोका पोहोचण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने रानवेली व झुडपे छाटावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
शेतकर्यांची घेवडा काढणीची लगबग सुरू असताना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर व परिसरात तब्बल अडीच तास ढगफुटी सारखा वळवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागातील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीराम उद्योग महाविद्यालय, पाणीव (ता. माळशिरस) यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे कृषिकन्या प्रणिता कृष्णा जाधव हिने शेतकर्यांच्या जनावरांसाठी मोफत लसीकरण व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून पडणार्या संततधार पावसामुळे शेतातील पिकात पाणी साचून घेवडा, वाटाणा, बटाटा यांसह आणखी काही पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासकीय यंत्रणेने संबंधित शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.
पुसेगावसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली असून, पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तसेच पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पेरणीस केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.
माण तालुक्यातील पळशी गाव हे शेतीच्या बाबतीत सधन समजले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या पावसाच्या जोरावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची लागवड केली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील पुष्कर तलाव सुमारे 70 टक्के भरला आहे. तलावात साठलेल्या पाण्यामुळे शिंगणापूर गावासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच दुष्काळवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने 2014 पासून ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पोचपावती मिळाल्याचेही गावकरी सांगत आहेत.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खटाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेल्या नेर तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल पाणीसाठ्यात सात फूट वाढ झाली आहे. परिणामी नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडी पर्यंतच्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
जावळी तालुक्यामध्ये बामणोली, कास विविध भागांत पावसाचा जोर वाढला आहे. जावळी परिसरात बुधवारी गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत जावलीत 786.91 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली होती.
सातारा जिल्ह्याला गुरुवारी धुवाँधार पावसाने झोडपून काढले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. दरम्यान, मांढरेदवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.